नवी दिल्ली: भारतीय शेअर बाजारात बुधवारी नायका (Nykaa) ही कंपनी सूचिबद्ध झाली. काही दिवसांपूर्वीच नायकाचा आयपीओ बाजारपेठेत आला. या आयपीओला गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. आज भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर नायकाच्या समभागाने 2018 रुपयांची पातळी गाठली. त्यामुळे आज बाजारपेठेत नायकाचा चांगलाच बोलबाला राहिला.
यानिमित्ताने नायका कंपनी आणि तिच्या सीईओ फाल्गूनी नायर हे नाव प्रचंड चर्चेत आहे. फाल्गूनी नायर यांनी वयाच्या पन्नाशीत नायकाची मूहूर्तमेठ रोवली. स्टार्टअप म्हणून सुरु केलेली नायका कंपनी ही भारतातील महिलेच्या नेतृत्त्वाखालील एकमेव युनिकॉर्न कंपनी ठरली आहे. भांडवली बाजारात नायकाच्या समभागाच्या लिस्टिंगनंतर फाल्गूनी नायर यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. 58 वर्षीय फाल्गूनी नायर हा जगातील श्रीमंत महिलांच्या पंक्तीत विराजमान झाल्या आहेत.
फाल्गूनी नायर यांनी वयाच्या पन्नाशीत असताना त्यांनी नायकाची स्थापना केली होती. फाल्गूनी नायर यांच्याकडे नायकाचे जवळपास 50 टक्के समभाग आहेत. नायकाच्या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या होत्या. त्यामुळे नायकाच्या समभागाला इश्यू प्राईसपेक्षा 89 टक्के अधिक किंमत मिळाली होती. कंपनीचा समभाग बीएसईवर 77.87% प्रीमियमसह 876 रुपयांनी लिस्ट झाला. तर एनएसईवर Nykaa चे चा समभाग 79.38% प्रीमियमसह 893 2018 रुपयांना सूचिबद्ध झाला.
फाल्गूनी नायर यांनी 2012 मध्ये नायकाची स्थापना केली. पुरुष आणि महिलांसाठी ऑनलाईन सौदर्यंप्रसाधाने पुरवण्याच्या उद्देशाने ही कंपनी स्थापन करण्यात आली. तोपर्यंत ग्राहकांना सौदर्यंप्रसाधने विकत घेण्यासाठी स्थानिक दुकानदारांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र, नायका कंपनीने ही सर्व समीकरणे बदलून टाकली. स्मार्टफोनवरील एका क्लिकवर ग्राहकांना हवी असलेली दर्जेदार सौदर्यंप्रसाधाने आणि इतर उत्पादने उपलब्ध होऊ लागली. अगदी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्यांची उत्पादनेही नायकाच्या संकेतस्थळावर सहजपणे मिळू लागली.
त्यामुळे नायका हा ब्रँड अल्पावधीत लोकप्रिय झाला. नायकाच्या संकेतस्थळावर मेबेलाईन, लॅक्मे, लॉरेल, MAC, Huda Beauty आणि Estee Lauder यासारख्या 300 हून अधिक ब्रँडसची उत्पादने उपलब्ध आहेत. सौदर्यंप्रसाधने आणि लिपस्टीकच्या असंख्य शेडसमुळे नायका ही आघाडीची ऑनलाईन रिटेलर कंपनी म्हणून नावारुपाला आली. 2020-21 या आर्थिक वर्षात ‘नायका’च्या उत्पादनविक्रीत 35 टक्क्यांनी वाढ झाली. हा आकडा जवळपास 33 कोटी डॉलर्स इतका होता.
संबंधित बातम्या:
गुजरातच्या तरुणाने आई-वडिलांकडून 8000 रुपये उधार घेऊन टाकली चहाची टपरी; अवघ्या चार वर्षात कोट्यधीश
वडील विकायचे फळं, मुलाने बनवलं ‘नॅचरल्स आईस्क्रीम’; उभारला 300 कोटींचा व्यवसाय