मुंबई – सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून (OMCS) मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले. नव्या दरानुसार ऑईल कंपन्या असलेल्या आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात कुठलीही कपात केली नसून, इंधनाच्या किमती स्थिर आहेत. सलग 19 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी चार नोव्हेंबरला केंद्राकडून उत्पादन शुल्कात कपात करण्यात आल्याने, पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर दहा रुपयांनी कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत, त्यामुळे पेट्रोल, डिझेचे दर आणखी कमी होई शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
साधारणपणे कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर अवलंबून असात. कच्च्या तेलाचे दर वाढले की पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात आणि दर कमी झाले तर इंधनाचे दर देखील कमी होतात. भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
शेअरबाजारात सलग दुसाऱ्या दिवशी पडझड; सेंसेक्स 748 अंकांनी घसरला
गुंतवणुकीपूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होऊ शकतो मोठा तोटा