Marathi News Business Old PNB checkbooks closed from 1st October, call this number and get new checkbook
PNB चे जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून बंद, या क्रमांकावर कॉल करा अन् नवं चेकबुक मिळवा
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) चे विद्यमान चेकबुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. म्हणून जर तुमच्याकडे या बँकांची जुनी चेकबुक असतील तर नवीन चेकबुकसाठी अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही.
1 / 5
जर तुमचे खाते देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सरकारी बँकेत म्हणजेच पीएनबीमध्ये असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची. कारण पीएनबीने चेकबुकसंदर्भात मोठी घोषणा केलीय. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) चे विद्यमान चेकबुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. म्हणून जर तुमच्याकडे या बँकांची जुनी चेकबुक असतील तर नवीन चेकबुकसाठी अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही. बँकेत जाऊन तुम्ही नवीन चेकबुक सहज मिळवू शकता.
2 / 5
1 एप्रिल 2020 रोजी OBC आणि UBI चे PNB मध्ये विलीनीकरण झाली. आता ग्राहकापासून दोन्ही बँकांच्या शाखेपर्यंत सर्व काही पीएनबीचे आहे. पीएनबीने सोशल मीडियाद्वारे सांगितले की, 1 ऑक्टोबर 2021 पासून ई-ओबीसी आणि ई-यूबीआयच्या जुन्या चेकबुक बंद केल्या जातील. ओबीसी आणि यूबीआयचे जुने चेकबुक पीएनबीच्या नवीन चेकबुकसह बदला. हे चेकबुक पीएनबीच्या अद्ययावत आयएफएससी कोड आणि एमआयआरसीसह येईल.
3 / 5
पीएनबीने ट्विट केले आहे की, ग्राहक नवीन चेकबुकसाठी बँक शाखा किंवा बँक एटीएम किंवा पीएनबी वनद्वारे अर्ज करू शकतो. याशिवाय ग्राहक इंटरनेट बँकिंगद्वारे पीएनबीच्या अद्ययावत नवीन चेकबुकसाठी अर्ज करू शकतात. पीएनबीने म्हटले आहे की, नवीन चेकबुकवर पीएनबीचे आयएफएससी आणि एमआयआरसी कोड लिहिले जातील. बँकेने टोल फ्री क्रमांक 18001802222 देखील जारी केलाय. ग्राहक या पुस्तकावर कॉल करून चेकबुकबद्दल तपशील मिळवू शकतात.
4 / 5
\
5 / 5