अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नवीन आयकर प्रणाली लोकप्रिय करण्यावर भर दिला. त्यासाठी नवीन आयकर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वरुन वाढून 75,000 रुपये करण्यात आले. तसेच टॅक्स स्लॅब बदलण्यात आला. नवीन कर प्रणालीत आता 7.75 रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर एक रुपयाही कर लागणार नाही. तसेच जुन्या कर प्रणालीनुसार तुमचा पगार दहा लाख असेल तर तुम्हाला काहीच कर लागणार नाही. मात्र, त्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक करावी लागणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीत बदल केला आहे. स्टँडर्ड डिडक्शन वाढवले आहे. त्यामुळे 7.75 रुपये वार्षिक उत्पन्नावर कर लागणार नाही. परंतु तुमचे त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास कर लागणार आहे. तुमचे उत्पन्न दहा लाख असेल तर नवीन करप्रणालीत 42,500 रुपये कर लागणार आहे.
नवीन कर पद्धत | मागील वर्षाची नवीन कर पद्धत | आताची नवीन कर प्रणाली | |
उत्पन्न (वार्षिक) | 10,00000 रुपये | 10,00000 रुपये | |
स्टँडर्ड डिडक्शन | 50,000 रुपये | 75,000 रुपये | |
करपात्र उत्पन्न | 950,000 रुपये | 925,000 रुपये | |
एकूण कर | 52,500 रुपये | 42,500 रुपये | 10,000 रुपये फायदा |