मोदींचा एका शब्दाचा SMS आणि रतन टाटांनी 4 दिवसात नॅनो प्लांट गुजरातला हलवला

| Updated on: Oct 10, 2024 | 10:24 PM

उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री निधन झाले. मुंबईत आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांच्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्यापासून बरंच काही शिकण्यासारखं आहे. रतन टाटा यांनी जेव्हा नॅनो प्रोजेक्ट सुरु केला तेव्हा त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

मोदींचा एका शब्दाचा SMS आणि रतन टाटांनी 4 दिवसात नॅनो प्लांट गुजरातला हलवला
Follow us on

टाटा सन्सचे प्रमुख रतन टाटा यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण देशात शोककळा पसरली. प्रत्येकाला आपल्या जवळचा व्यक्ती गेल्याची भावना दाटून येत होती. रतन टाटा यांच्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात सन्मान होता. त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात यश मिळवले. ते जरी आपल्यात नसले तरी त्यांनी केलेले कार्य हा देशाच्या कायम स्मरणात राहील. रतन टाटा यांनी सर्वसामान्यांना परवडणारी नॅनो कार देखील लाँच केली होती.

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांना केवळ एका शब्दाचा एसएमएस पाठवला होता. या एसएमएसमुळे २००८ मध्ये टाटा नॅनो प्रकल्प पश्चिम बंगालमधून थेट गुजरातमध्ये हलवण्यात आला होता. मोदींचा तो एसएमएस ‘वेलकम’ असा होता.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात हिंसक निदर्शने झाल्यानंतर रतन टाटा यांनी पश्चिम बंगालमधून टाटा नॅनो प्रकल्प राज्यातून बाहेर काढत असल्याची घोषणा केली होती. उद्योगपती रतन टाटा यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत करत असताना नरेंद्र मोदींनी टाटा यांना हा एसएमएस पाठवला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१० मध्ये साणंदमध्ये २००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून बांधलेल्या टाटांच्या नॅनो प्लांटचे उद्घाटन करताना ते म्हणाले होते की, कोलकाता येथे पत्रकार परिषदेत रतन टाटा म्हणाले की, मी पश्चिम बंगाल सोडत आहे, तेव्हा मी त्यांना सांगितले होते. ‘वेलकम’ असा छोटा एसएमएस पाठवला आणि आता तुम्ही पाहू शकता की रु 1 एसएमएस काय करू शकतो.

4 दिवसात प्लांट हलवला

रतन टाटा यांनी 3 ऑक्टोबर 2008 रोजी नॅनो प्रकल्प पश्चिम बंगालच्या हलवण्याची घोषणा केली होती. पुढील 4 दिवसांत गुजरातमधील साणंद येथे प्रकल्प उभारला जाईल असे सांगितले होते.

नॅनो प्रकल्पाला देशाबाहेर जाऊ दिले नाही

तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले होते की, अनेक देश नॅनो प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहेत, परंतु गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प भारताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. कार्यक्षमतेत कॉर्पोरेट संस्कृतीशी जुळणारी आणि राज्याच्या वेगवान विकासात मोठी भूमिका बजावत असल्याचे सांगून त्यांनी सरकारी यंत्रणेचे कौतुक केले.

तत्कालीन गुजरात सरकारचे कौतुक

जून 2010 मध्ये साणंद येथील प्लांटमधून पहिल्या नॅनो कारच्या रोलआउटच्या वेळी रतन टाटा यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकारचे कौतुक केले होते. रतन टाटा म्हणाले होते की, जेव्हा आम्ही दुसरा नॅनो प्लांट शोधला तेव्हा आम्हाला शांतता आणि सौहार्दाच्या दिशेने वाटचाल करायची होती. गुजरातने आम्हाला आवश्यक ते सर्व दिले. आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. टाटाने 2018 मध्ये नॅनो कारचे उत्पादन बंद केले.