नवी दिल्ली : जर तुमच्याकडे तुमच्या बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा नसेल, तर 50,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे धनादेश देणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यास सुरुवात केलीय. बहुतेक बँका 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करतील.
विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम (CTS) साठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम जाहीर केली होती. या नियमानुसार, बँका ही सुविधा सर्व खातेधारकांना त्यांच्या इच्छेनुसार 50 हजार किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशासाठी लागू करू शकते.
आरबीआयच्या या नियमानुसार, धनादेश देण्यापूर्वी तुम्हाला बँकेला याबद्दल माहिती द्यावी लागेल अन्यथा धनादेश स्वीकारला जाणार नाही. तुमचा चेक नाकारला जाईल. या नियमामुळे ज्येष्ठ नागरिक जे नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या सेवा वापरत नाहीत, त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात.
अॅक्सिस बँकेसह काही बँकांनी 50 हजारांपेक्षा जास्त धनादेशांसाठी पीपीएस अनिवार्य केलेत, ज्या अंतर्गत ग्राहकांना नेट/मोबाईल बँकिंगद्वारे किंवा शाखेला भेट देऊन बँकेला चेक तपशील द्यावा लागेल. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कोटक महिंद्रा बँकेने 50,000 रुपयांच्या वरील धनादेशांसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली. सध्या या बँकांनी ते ग्राहकांसाठी पर्यायी ठेवले आहे. हा नियम लागू करण्याचा हेतू ग्राहकांची सुरक्षा आहे. ही प्रणाली चेक फसवणूक रोखणार आहे.
संबंधित बातम्या
PHOTO : पोस्टाच्या 10 हजारांच्या गुंतवणुकीवर दरवर्षी किती कमाई होणार, पटापट तपासा
आता ऑनलाईन फसवणूक टाळता येणार, 1 जानेवारीपासून असे करा पेमेंट
Pay a check for more than Rs 50,000? The RBI’s new rules know more