मुंबई : कोरोनाच्या भीषण संकटात अनेकांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. अशात आता भाड्याने राहणाऱ्या नागरिकांसाठी आणखीनच समस्या आहेत. अशात पेटीएसकडून (Paytm) एक खास ऑफर ग्राहकांसाठी देण्यात आली आहे. आता भाडेकरू घराचे भाडे क्रेडिट कार्डद्वारेही भरू शकतात. पेटीएमकडून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी फार वेळही लागणार नाही. पैसे ताबडतोब जमीनमालकाच्या बँक खात्यात पोचतील. (paytm new offer pay house rent with credit cards and get 1000 rs cashback here is the process)
खरंतर, डिजिटल वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमने क्रेडिट कार्डमधून घराचं भाडे भरल्यावर तब्बल 1000 रुपये कॅशबॅक जाहीर केला आहे. बरं फक्त कॅशबॅक नाहीतर भाड्याच्या प्रत्येक व्यवहारावर तुम्हाला क्रेडिट कार्ड पॉईंटदेखील मिळणार आहेत.
पेटीएमधून कसं देणार भाडं?
– क्रेडिट कार्डद्वारे घरमालकाला घराचं भाडं देण्यासाठी पेटीएम होम स्क्रीनवरील रिचार्ज अॅन्ड पे या पर्यायावर जा.
– यानंतर पेमेंट्स निवडा.
– वापरकर्ते त्यांच्या क्रेडिट कार्डद्वारे थेट त्यांच्या घरमालकांच्या बँक खात्यात पैसे पाठवू करू शकतात.
– पेटीएम यूपीआय, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंगद्वारे घरभाडं देण्याची सुविधा देखील देत आहे.
– यासाठी तुम्हाला घर मालकाच्या बँक खात्याचाही तपशील भरावा लागणार आहे.
– इनोव्हेटिव्ह डॅश बोर्ड तुम्हाला भाड्याच्या देयकाशी संबंधित सर्व प्रकारच्या देयके ट्रॅक करण्यास मदत करतं.
– इतकंच नाही तर भाडं देण्याची तारीख जवळ आली की याचीही आठवण तुम्हाला करून देण्यात येईल.
आता दुकानावर लावा पेटीएम साऊंट बॉक्स
जर तुम्ही दुकानदार असाल आणि पेटीएमकडून पैसे घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ग्राहकांच्या गर्दीमुळे अनेकदा दुकानात इतकी गर्दी असते की पैसे घेताना गडबड होते. अशात हल्ली ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दुकानावर ऑनलाईन पेमेंटची सुविधा दिली आहे. पण गर्दीच्या वेळी खात्यामध्ये पैसे आले का? हे तपासणं खरंतर अशक्य होतं. त्यामुळे आता पेटीएम साऊंड बॉक्सची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे खात्यामध्ये पैसे येताच तुम्हाला हे कळेल.
या साऊंडला लावण्यावरून दुकानदारांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. तो कसा लावायचा? त्यासाठी पेटीएमशी कसा संपर्क साधायचा? यासाठी किती खर्च येतो? अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची उत्तर या बातमीतून तुम्हाला मिळतील.
कसा लावणार पेटीएस साऊंट बॉक्स?
तुम्हालाही जर पेटीएमचा साऊंड बॉक्स लावायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. हा बॉक्स थेट तुमच्या पत्त्यावर येईल. या साऊंड बॉक्समध्ये तुम्हाला दरमहा बिल भरावं लागणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा पैसे भरल्यानंतर तुम्ही तुम्हाला 18 महिन्यांपर्यंत हा बॉक्स वापरू शकता.
काय आहे योजना?
या बॉक्सच्या योजनेत 499 रुपयांमध्ये हा खरेदी करावा लागेल. यानंतर वापरण्यासाठी तुम्हाला दरमहा 125 रुपये द्यावे लागतील. तर तुम्ही एकदाच या योजनेत 1999 रुपये दिले तर 18 महिन्यांकरिता तुम्हाला पैसे भरण्याची गरज नसते. यानंतर 18 महिने रिचार्ज केल्याशिवाय तुम्ही याचा वापर करू शकता. (paytm new offer pay house rent with credit cards and get 1000 rs cashback here is the process)
संबंधित बातम्या –
तुमच्या एका चुकीनं रिकामं होईल खातं, अशी होते ATM कार्ड क्लोनिंगमधून चोरी
तुमच्या दुकानावर लावा Paytm चा साऊंड बॉक्स, जाणून घ्या किंमत आणि प्रक्रिया
gold today rate : बजेटनंतर अवघ्या 9 दिवसांत सोनं झालं स्वस्त, पाहा तुमच्या शहरातले आजचे भाव
‘या’ बड्या बँकेत 1 मार्चपासून होणार आहे मोठा बदल, नाही करता येणार पैसे ट्रान्सफर
(paytm new offer pay house rent with credit cards and get 1000 rs cashback here is the process)