मुंबई : आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) च्या किंमतीत 10 रुपयांनी कपात करण्यात आली. या कपातीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 809 रुपयांवर आणण्यात आली. पेटीएम (Paytm) ने स्वस्त घरगुती गॅस खरेदी करण्यासाठी बंपर ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला फक्त 9 रुपयांमध्ये 809 रुपयांचे गॅस सिलेंडर मिळू शकेल. (paytm offer get 800 cashback on your first lpg gas cylinder booking)
पेटीएमकडून गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी हा कॅशबॅक (Cashback) उपलब्ध आहे. त्याअंतर्गत तुम्हाला सिलिंडर बुक केल्यावर 800 रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळेल. पेटीएमची ही ऑफर 30 एप्रिल 2021 पर्यंत वैध आहे.
कशी मिळवायची ऑफर
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम अॅप घ्यावा लागेल. अॅप डाऊनलोड केल्यानंतर गॅस एजन्सीद्वारे आपल्याला सिलेंडर बुकिंग करावे लागेल. सर्व प्रथम, आपण पेटीएम वर जा आणि Show more क्लिक करा. यानंतर, ‘Recharge and Pay Bills’ वर क्लिक करा. आपल्याकडे book a cylinder करण्याचा पर्याय असेल.
इथे तुम्हाला गॅस प्रोव्हायडर निवडावा लागेल. बुकिंग करण्यापूर्वी तुम्हाला FIRSTLPG चा प्रोमो कोड द्यावा लागेल जेणेकरून तुम्हाला कॅशबॅकची सुविधा मिळेल. ही कॅशबॅक ऑफर 30 एप्रिल 2021 रोजी कालबाह्य होत आहे. बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.
चार मेट्रो शहरांमध्ये एलपीजीची किंमत
एलपीजीच्या किंमती दहा रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. अनुदानाशिवाय 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 809 रुपये, कोलकातामध्ये 835.50 रुपये, मुंबईत 809 रुपये आणि चेन्नईमध्ये 825 रुपये केली गेली. (paytm offer get 800 cashback on your first lpg gas cylinder booking)
संबंधित बातम्या –
SBI ग्राहकांसाठी अलर्ट! आज 2:10 वाजता ठप्प होणार बँकेची ‘ही’ सेवा, आताच उरकून घ्या महत्त्वाचे काम
फक्त 5 हजारात सुरू करा बक्कळ कमाई देणारा व्यवसाय, पहिल्याच महिन्याला कमवाल 20000
Gold Silver Price Today : सोन्याच्या किंमती वाढल्या, चांदी घसरली; वाचा आजचे ताजे दर