नवी दिल्लीः इंडिया पोस्टाकडून सर्व केंद्र सरकार आणि राज्य सरकार निवृत्तीवेतनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेन्शनधारक आणि इतर सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जवळच्या टपाल कार्यालयातून हयातीचा दाखला मिळू शकतो, असं इंडिया पोस्टाने जाहीर केलेय. तंत्रज्ञान जाणकार नसलेल्या आणि हयातीचा दाखला घेण्यासाठी त्यांच्या बँकेत जावे लागले, अशा पेन्शनधारक आणि इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे. खरं तर काही वेळा निवृत्तीवेतनधारकाला त्यांचा हयातीचा दाखला मिळविण्यासाठी मालकाकडे जावे लागते. इंडिया पोस्टच्या या प्रस्तावामुळे केंद्र सरकारचे सुमारे 60 लाख निवृत्तीवेतनधारक आणि विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि इतर सरकारी एजन्सीच्या निवृत्तीवेतनधारकांना मोठा फायदा होणार आहे.
इंडिया पोस्टने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या उपक्रमाची घोषणा केली. पोस्टानं म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिक आता जवळच्या पोस्ट ऑफिसच्या सीएससी काऊंटरवर सहजपणे हयातीचा दाखला मिळवण्याची सेवा घेऊ शकतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचा हयातीचा दाखला सादर करावा लागेल. याद्वारे हे प्रमाणित केले गेले की, पेन्शनधारक जिवंत आहे आणि हे प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन थांबविली जाऊ शकते.
वरिष्ठ नागरिक अब सरलता से नज़दीकी डाकघर के सीएससी काउंटर पर जीवन प्रमाण सेवाओं का लाभ उठा सकते हैं। #AapkaDostIndiaPost
Senior citizens can now easily avail the benefit of Jeevan Praman services at the nearest post office CSC counter.#AapkaDostIndiaPost pic.twitter.com/tKrzifc6yc
— India Post (@IndiaPostOffice) July 15, 2021
इंडिया पोस्टच्या घोषणेनंतर पेन्शनभोगी पेन्शन वितरण एजन्सीऐवजी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्याने सेवा बजावली आहे, त्या प्राधिकरणाकडे जाऊ शकते. भविष्यात पेन्शन मिळविणे सुरू ठेवण्यासाठी त्याचा हयातीचा दाखला मिळवू शकेल. ज्या निवृत्तीवेतनधारकांना पोस्ट ऑफिस किंवा पेन्शन वितरण एजन्सीकडे जाण्यास अडचण येते, ते डिजिटल हयातीचा दाखला घेण्यासाठी जवळच्या जीवन प्रमाणपत्र केंद्राला भेट देऊ शकतात.
संबंधित बातम्या
ICICI बँकेने HPCL सह क्रेडिट कार्ड केले लॉन्च, इंधनावर वर्षभरात मिळणार 2400 रुपयांपर्यंत कॅशबॅक
Arogya Rakshak policy: LIC कडून आरोग्य विमा योजना सुरू, जाणून घ्या सर्व काही
pensioners can get life certificate from nearest post office check details here