पेन्शनधारकांचं टेन्शन दूर, आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार पेन्शनशी संबंधित माहिती

| Updated on: Jul 15, 2021 | 8:00 PM

केंद्र सरकारच्या आदेशानुसार बँकांनी पेन्शन स्लिप्स व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पेन्शनधारकांना पाठविण्याचे मान्य केलेय.

पेन्शनधारकांचं टेन्शन दूर, आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार पेन्शनशी संबंधित माहिती
Follow us on

नवी दिल्लीः निवृत्तीवेतनधारकांची मोठी अडचण दूर झालीय. आता लवकरच बँका त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवरही पेन्शन स्लिप पाठवण्यास प्रारंभ करणार आहेत. सध्या बँका पेन्शनधारकांना एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून याबाबत माहिती देतात. परंतु केंद्र सरकारच्या आदेशानुसार बँकांनी पेन्शन स्लिप्स व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पेन्शनधारकांना पाठविण्याचे मान्य केलेय. (Pensioners Tension Gone, Now Information Related To Pension Will Be Available On WhatsApp)

पेन्शनधारकांच्या सोयीसाठी मोठा निर्णय

एका अधिकृत आदेशानुसार, केंद्र सरकारने बँकांना बँक खात्यात निधी मिळाल्यावर एसएमएस आणि ईमेल व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडिया अॅप्लिकेशन्सचा वापर करून निवृत्तीवेतनाच्या स्लिप्स पाठविण्यास सांगितले. आदेशानुसार पेन्शनधारकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

पेन्शन स्लिप पाठविण्यासाठी सोशल मीडिया अॅप्सचा वापर

निवृत्ती वेतन आणि पेन्शन कल्याण विभागाने एक आदेशही जारी केलाय. एसएमएस आणि ईमेलशिवाय बँका पेन्शन स्लिप पाठविण्यासाठी व्हॉट्सएप सारख्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर करू शकतात. पीटीआयच्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात पेन्शन देण्यासाठी बँकांच्या केंद्रीय निवृत्तीवेतन वितरण केंद्रांची (सीपीपीसी) बैठक झाली, ज्यामध्ये पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनवर चर्चा झाली. आदेशानुसारच बैठकीतच बँकांना बँकांकडून मान्य करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅपवरून पेन्शन स्लिप पाठविण्यासारखे कल्याणकारी पावलं उचलण्यास सांगण्यात आले.

पेन्शन स्लिप हीच संपूर्ण माहिती असेल

पेन्शनधारकांना आयकर, महागाई सवलत रक्कम आणि डीआर थकबाकी याबाबत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून माहिती देण्याच्या या कल्याणकारी टप्प्यामुळे बँकांचे नुकसान झाल्याचे या आदेशात म्हटले आहे. बँकांनी या कल्पनेचे स्वागत केलेय आणि निवृत्तीवेतनधारकांना माहिती देण्याची तयारी दर्शविलीय. सर्व पेन्शन वितरित बँकांनी निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस व ईमेलद्वारे (जिथे उपलब्ध असेल तेथे) पेन्शन स्लिप द्याव्यात. पेन्शन स्लिपमध्ये मासिक पेन्शन, जमा केलेली रक्कम आणि कर कपात इत्यादींचा संपूर्ण तपशील असावा.

संबंधित बातम्या

ICICI Bank सह 3 बँकांकडून नवी सेवा सुरू; मोबाईल नंबरवरून दररोज पाठवा 1 लाख रुपये

चांगली बातमी! आता फक्त 5 मिनिटांत अंगठा लावून ATM मधून काढा रेशन, जाणून घ्या प्रक्रिया

Pensioners Tension Gone, Now Information Related To Pension Will Be Available On WhatsApp