नवी दिल्लीः पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता केंद्रीय मंत्रालयाने त्याला नवी सुविधा दिलीय. अशा पेन्शनधारकाला हयातीचा दाखला सादर करण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. सेवानिवृत्त आणि वृद्ध नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सरकारने चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणले. पेन्शनधारकांसाठी ही प्रणाली सुरू करण्यात आलीय. पेन्शनधारक आता केवळ मोबाईल अॅप वापरून हयातीचा दाखला सादर करू शकतील. या तंत्रज्ञानाच्या मदतीने केंद्र सरकारच्या सुमारे 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
या सुविधेचा शुभारंभ करताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “जीवन प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान ही एक ऐतिहासिक आणि दूरगामी सुधारणा आहे, कारण त्याचा केवळ 68 लाख केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या जीवनावरच परिणाम होणार नाही, तर कोट्यवधी पेन्शनर्सच्या जीवनावरही परिणाम होईल. जे या विभागाच्या अधिकारक्षेत्राबाहेर येतात जसे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), राज्य सरकार निवृत्तीवेतनधारक इत्यादी चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांनी विकसित केलेय.
ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा अतिशय फायदेशीर आहे, कारण त्यांना जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही. अनेक वृद्ध पेन्शनधारक आहेत, ज्यांना बायोमेट्रिक आयडीसाठी बँकेत जाऊन बोटांचे ठसे द्यावे लागतात. अनेकवेळा असे देखील होते की, फिंगरप्रिंट योग्यरित्या स्कॅन केले जात नाही, ज्यामुळे पेन्शन थांबण्याची भीती कायम असते. पेन्शन आणि पेन्शनर्स वेल्फेअर विभागाने ट्विटद्वारे चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल सांगितले. या प्रणालीचे फायदे, आवश्यक निकष आणि प्रक्रिया ट्विटमध्येच सांगण्यात आलीय. ही संपूर्ण यंत्रणा UIDAI सॉफ्टवेअरच्या आधारे तयार करण्यात आलीय.
या नवीन तंत्रज्ञानाद्वारे पेन्शनर्स किंवा फॅमिली पेन्शनर ओळखता येणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे पेन्शनधारक कोणत्याही अँड्रॉइड आधारित स्मार्टफोनवरून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील. या प्रणालीच्या मदतीने डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन संग्रहित केले जाऊ शकते. कोणताही पेन्शनधारक किंवा पेन्शन वितरण करणारी एजन्सी जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन पाहण्यास सक्षम असेल.
Benefits, Requirements and Process of generating Digital Life Certificate (Jeevan Pramaan) through Face Recognition Service based on UIDAI Aadhaar software. @DrJitendraSingh @PIB_India @mygovindia #DLC #JeevanPramaan #LifeCertificate #Aadhaar pic.twitter.com/Lv3R0XTMWC
— D/o Pension & Pensioners’ Welfare , GoI (@DOPPW_India) November 30, 2021
Android स्मार्टफोन
इंटरनेट कनेक्शन
पेन्शन देणाऱ्या एजन्सीमध्ये आधारसोबत नोंदणीकृत क्रमांक द्यावा लागेल
कॅमेरा रिझोल्युशन 5MP किंवा उच्च असावा
जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे
Google Playstore वर जा आणि AadhaarFaceID अॅप डाऊनलोड करा. यासाठी तुम्ही https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd ला भेट देऊ शकता किंवा https://jeevanpramaan.gov.in/ ला भेट देऊ शकता.
ऑपरेटर प्रमाणीकरण पूर्ण करा आणि ऑपरेटरचा चेहरा स्कॅन करा. येथे ऑपरेटर म्हणजे पेन्शनधारक आहे.
आता तुमचा मोबाईल फोन लाइफ सर्टिफिकेट तयार करण्यासाठी वापरा. त्यावर पेन्शनधारकांची पडताळणीही केली जाणार आहे.
पेन्शनर माहिती भरा
पेन्शनधारकाचे थेट छायाचित्र काढा. चांगले चित्र मिळविण्यासाठी पुरेसा प्रकाश जेणेकरून चेहरा ब्लर होणार नाही
आता सबमिट बटण दाबा
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल ज्यामध्ये जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची लिंक दिली जाईल.
जीवन प्रमाण अॅप सध्या फक्त भारतात उपलब्ध आहे. ही सुविधा इतर कोणत्याही देशात दिली जात नाही. पेन्शन वेळेवर मिळण्यासाठी योग्य माहिती भरणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या
देशभरातील निष्क्रिय खात्यांमध्ये तब्बल 26,697 कोटी रुपये पडून; ‘अशी’ काढता येते रक्कम
सर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक; वीज कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकार घेणार मोठा निर्णय