मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने ( RBI ) सलग पाच वेळा रेपो रेटमध्ये वाढ केल्याने कर्ज घेतलेल्या व्यक्तींच्या खिशावरचा ताण वाढला आहे. एप्रिल एमपीसीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट न वाढवण्याचा निर्यण घेतला. त्यानंतर काही प्रमाणात कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. पण रेपो रेट वाढल्यानंतर बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षीपासून रेपो दरात 250 बेसिस पॉइंटने (bps) वाढ झाली आहे. शेवटची वाढ फेब्रुवारी 2023 मध्ये 25 bps ने केली होती, ज्यामुळे रेपो रेट 6.5 टक्क्यांवर आला होता. सलग दरवाढीमुळे मुदत ठेवींवरील परतावा खूपच आकर्षक झाला आहे.
आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या एफडीवरील व्याजदरांबाबत तुलना करुयात.
ICICI बँक 3.00% आणि 7.10% p.a दरम्यान व्याज दरांसह मुदत ठेव (FD) योजना ऑफर करते. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर दिला जातो. योजनेचा कालावधी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत आहे. 3.50% आणि 7.60%. हे दर 24 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.
HDFC बँकेत तुम्ही 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी करु शकता. यावर तुम्हाला 3% ते 7.1% p.a पर्यंत व्याजदर मिळवू शकतो. ज्येष्ठ नागरिकांना 0.50% पी.ए.च्या अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळतो. 7 दिवस ते 5 वर्षे कालावधीसाठी 3.5% ते 7.6%. हे दर 21 फेब्रुवारीपासून लागू आहेत.
अॅक्सिस बँकेच्या एफडी दराबाबत बोलायचं झालं तर बँक तुम्हाला 3.50-7.20% p.a चे FD दर ऑफर करते. सात दिवसांपासून ते दहा वर्षापर्यंतच्या एफडीवर बँक तुम्हाला 3.50-7.95% व्याज ऑफऱ करते. हे दर 21 एप्रिलपासून लागू आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आणि फायद्यांसह 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर ऑफर करते. SBI FD व्याजदर 3.00% ते 7.10% आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी दर 3.50% ते 7.60% आहे. हा दर 15 फेब्रुवारीपासून लागू आहे.