मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today 24 February) सातत्याने वाढ होत आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक पटींनी वाढ झाली. दररोज 30 पैशांपर्यंत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारीही इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली पण आज बुधवारी मात्र दरांमध्ये फारसे बदल झाले नाहीत. (petrol diesel price hike today 24 February here is the new rates of all city mumbai delhi)
आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीही 35 पैशांनी वाढल्या. खरंकर, तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.
प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर
नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.93 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.34 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.1 2रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92. 90 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.19 रुपये प्रति लिटर
प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव
नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.32 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.44 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.20 रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.31 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.76 रुपये प्रति लिटर
दररोज 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.
त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel price hike today 24 February here is the new rates of all city mumbai delhi)
संबंधित बातम्या –
Petrol Diesel Price Today: पुन्हा एकदा इंधनाचा भडका, वाचा तुमच्या शहरातले पेट्रोल-डिझेलचे दर
10 हजार गुंतवणूक वर्षाला मिळवा 16 लाख, पोस्ट ऑफिसची सगळ्यात चांगली योजना
Post Office ची धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर महिन्याला मिळेल उत्तम परतावा
(petrol diesel price hike today 24 February here is the new rates of all city mumbai delhi)