मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमती सामान्यांसाठी चिंतेचे प्रमुख कारण ठरत आहे. मुंबईत बुधवारी एका लीटर पेट्रोलची (Petrol) किंमत तब्बल 105 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तर डिझेलही लवकरच शंभरी गाठेल, अशी चिन्हे दिसत आहेत. मंगळवारी इंधनाच्या दरात जून महिन्यातील 16 वी दर वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोलचे दर 34 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी महागले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी कोणताही बदल झालेला नाही. (Petrol and diesel prices in Maharashtra)
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली होती. गेल्या 33 दिवसांत पेट्रोल तब्बल 8.40 आणि डिझेल 8.47 रुपयांनी महागले आहे. पेट्रोलने शंभरी गाठलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नईचा समावेश आहे.
मुंबई: पेट्रोल- 104.90, डिझेल 96.72
पुणे: पेट्रोल- 104.48, डिझेल 94.83
नाशिक: पेट्रोल- 105.24, डिझेल 95.56
औरंगाबाद: पेट्रोल- 106.14, डिझेल 97.96
कोल्हापूर: पेट्रोल- 105.00, डिझेल 95.35
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.
संबंधित बातम्या:
मोदी सरकारच्या निर्णयानंतर साखर कारखान्याचा मोठा निर्णय; ‘या’ गोष्टीसाठी 450 कोटींची तजवीज
Petrol & Diesel: मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?
वर्षाअखेरपर्यंत पेट्रोल 125 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज, तज्ज्ञांचं म्हणणं काय?
(Petrol and diesel prices in Maharashtra)