नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) किंमतींमध्ये वारंवार चढ-उतार होत असल्यामुळे आपल्याला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. तेल कंपन्या रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल करतात. अशा परिस्थितीत किंमती वाढल्या की कमी झाल्या हे माहिती असणं महत्त्वाचं आहे. सध्या दररोज एक-दोन दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. (petrol diesel price today petrol todays price here know the todays rate of mumbai delhi noida and kolkata)
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, सोमवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 86.30 रुपये आहे तर मुंबईत ती 92.86 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल दर प्रति लिटर 87.69 रुपये तर चेन्नईमध्ये 88.82 रुपये प्रतिलिटर आहे. त्याचबरोबर, डिझेलविषयी बोलायचं झालं तर दिल्लीत आज डिझेल 76.48 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात असून मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 83. 30, कोलकातामध्ये डिझेलचा दर 83. 30 रुपये, चेन्नईमध्ये डिझेलचा दर 81.71 रुपयांवर पोहोचला आहे.
प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर
दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 86.30 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 92.86 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 87.69 रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 88.82 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Petrol Price Today) : 85.67 रुपये प्रति लिटर
प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर
दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 76.48 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 83.30 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 80.08 रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 81.71 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Diesel Price Today) : 76.93 रुपये प्रति लिटर
पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जाण्याचं कारण काय?
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90 च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत. मात्र, प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मूळ दर हा 28.50 रुपये प्रति लीटर असते. तर डिझेलचा मूळ दर हा 29.52 रुपये प्रति लीटर असते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते.
सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात (Petrol Price Today).
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल. (petrol diesel price today petrol todays price here know the todays rate of mumbai delhi noida and kolkata)
संबंधित बातम्या –
पेट्रोल आणि डिझेलचा पुन्हा एकदा भडका; नांदेड, परभणीत पेट्रोल सर्वाधिक महाग
बजेटच्या दिवशी सोने स्वस्तात खरेदी करण्याची संधी; 10 ग्रॅम सोने खरेदी केल्यास इतक्या रुपयांची सूट
Gold Silver Price Today : सोने-चांदी पुन्हा एकदा झाले महाग; जाणून घ्या तोळ्याचा भाव
(petrol diesel price today petrol todays price here know the todays rate of mumbai delhi noida and kolkata)