नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचं (PETROL-DISEL RATE) चक्र वेगान सुरू आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून स्थिर असलेल्या किंमतीचा भुर्दंड दररोज भाववाढीने सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. गेल्या 15 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 13 वेळा वाढ करण्यात आली आहे. यापैकी 10 वेळा प्रत्येकी 80 पैशांनी दरवाढ करण्यात आली. तेल कंपन्यांच प्रत्येकवेळी 80 पैसे दरवाढीचं गणित (RATE CALCULATION) जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तेल कंपन्यांनी (OIL COMPANY) आज (मंगळवारी) पेट्रोल-डिझेलच्या भावात पुन्हा 80 पैशांनी वाढ केली. गेल्या पंधरा दिवसात केवळ दोन दिवस वगळता अन्य 13 दिवशी इंधनाची सलग दरवाढ करण्यात आली आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती 4 नोव्हेंबर 2021 पासून 22 मार्च 2022 पर्यंत स्थिर होत्या. त्यानंतर दरवाढीचा डोस सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.
तेल कंपन्यांकडून 80 पैशांनी दरवाढ केली जाते. पेट्रोल-डिझेल किंमत वाढीसाठी केंद्रानं सूत्र निश्चित केलं आहे. त्यानुसार तेल कंपन्या एक रुपयांपर्यंत वाढ करू शकतात. त्यामुळे तेल कंपन्यांनी विचारविनिमयानंतर 80 पैशाचे सूत्र निश्चित केले आहे. त्यामुळे अधिकतम 80 पैसे प्रति लीटर दराने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली जाते.
कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनी पेट्रोल-डिझेलच्या सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविला आहे.त्यामुळे महागाईच्या वाढीचं संकट निर्माण झालं आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीच्या काळात भाव स्थिर ठेवण्याच्या धोरणामुळे सध्या दररोज दरवाढीला सामोरे जावे लागत आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख मध्ये पेट्रोलचे भाव शंभरीपार पोहचले आहे. मुंबईत पेट्रोलच्या सर्वाधिक किंमती आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईट वर देखील पेट्रोलच्या किंमती उपलब्घ आहेत. RSP आणि आपल्या शहराचे नाव लिहून 9224992249 नंबर वर मेसेज केल्यास किंमती कळतात.
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि दर एकत्रित केल्यानंतर भाव ठरतो.
मुंबईत महागाईचा भडका, आज मध्यरात्रीपासून CNG आणि PNG च्या किमतीत मोठी वाढ
SHARE MARKET: शेअर बाजारात नफेखोरी, सेन्सेक्स गडगडला; 435 अंकांची घसरण