पीएफ हस्तांतरण झाले सोपे; ‘ईपीएफओ’चा मोठा निर्णय, खासगी कर्मचाऱ्यांना दिलासा

| Updated on: Nov 24, 2021 | 8:47 AM

ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून पीएफबाबत काही महत्त्वापूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या नव्या निर्णयाचा कर्मचारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे. नव्या नियमानुसार पीएफ हस्तांतरणाची प्रक्रिया आता आणखी सोपी झाली आहे.

पीएफ हस्तांतरण झाले सोपे; ईपीएफओचा मोठा निर्णय, खासगी कर्मचाऱ्यांना दिलासा
ईपीएफओ
Follow us on

नवी दिल्ली : ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून पीएफबाबत काही महत्त्वापूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या नव्या निर्णयाचा कर्मचारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे. नव्या नियमानुसार समजा तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल आणि त्यानंतर तुम्ही राजीनामा देऊन दुसरी कंपनी जॉईन केली, तर तुम्हाला आता तुमच्या नव्या खात्यात पीएफ ट्रान्सफर करण्याची गरज नाही. हा पीएफ आपोआपच तुमच्या नव्या पीएफ खात्यामध्ये जमा होणार आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कंप्यूटिंग (C-DAC) च्या वतीने ही अत्याधुनिक कार्यप्रणाली विकसीत करण्यात येत आहे.

वेळेची बचत 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 229 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फायदा हा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. कारण खासगी क्षेत्रातील कर्मचारी अनेकदा आपल्या आर्थिक प्रगतीसाठी नोकऱ्या बदलत असतात. नोकरी बदलल्यानंतर त्यांना आपले पीएफ खाते देखील बदलावे लागते. नव्या खात्यात जुना पीएफ फंड ट्रान्सफर करण्यासाठी कगदपत्रांची पूर्तता करावी लागेत. या सर्व प्रक्रियेमध्ये मोठ्याप्रमाणात वेळ खर्च होतो. हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

डिजिटलायजेशन वर भर 

पुढे बोलताना ईपीएफओ कार्यालयाने म्हटले आहे की, आम्ही सातत्याने पीएफबाबतची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली आहे. त्यामुळे पीएफची संपूर्ण प्रक्रियेचे डिजिटलायजेशन व्हावे यावर आमचा भर आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

एलआयसीच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवा पैसे; आयुष्यभर दर महिन्याला मिळेल 20 हजारांची पेन्शन

एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन आयडियाचा ग्राहकांना झटका; सर्व प्रिपेड प्लॅन महागणार, जाणून घ्या नवे दर