नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात गतीशक्ती राष्ट्रीय योजनेची (Gatishakti Yojna) घोषणा केली. मोदी सरकारने या योजनेसाठी 100 लाख कोटींची तरतूद केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरात पायाभूत सुविधांच्या विकासासोबत मोठ्याप्रमाणावर रोजगारही उपलब्ध होतील.
आधुनिकीकरणासाठी भारताला पायाभूत सुविधांची निर्मिती करुन सर्वांगणी विकास साधता आला पाहिजे. यामध्ये गतीशक्ती योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मोदींनी सांगितले. देशातील पायाभूत सुविधा या आणखी बळकट केल्या पाहिजेत. दळणवळणासाठी गतीशक्ती ही खास योजना असेल. जेणेकरून सामान्य माणसांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. त्यामुळे लोकांची आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढेल. या सगळ्यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देणे शक्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
भारत को आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर के साथ ही इंफ्रास्ट्रक्चर निर्माण में होलिस्टिक अप्रोच अपनाने की भी जरूरत है।
भारत आने वाले कुछ ही समय में प्रधानमंत्री गतिशक्ति- नेशनल मास्टर प्लान को लॉन्च करने जा रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 15, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणावेळी देशभरात वंदे भारत ट्रेन्स सुरु करण्याची घोषणा केली. त्यानुसार येत्या 75 आठवड्यात रेल्वे विभागाकडून 75 वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येतील. या ट्रेन्स भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन संपूर्ण देश जोडतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
आगामी काळात देशाचा विकास करायचा असेल तर उत्पादन क्षमता आणि निर्यात वाढवावी लागेल. भारतातील उत्पादकांनी त्यांचे उत्पादन भारताची ओळख असल्याचं लक्षात ठेवावं. जगाच्या बाजारपेठेवर आपलं अधिराज्य असावं हे स्वप्न देशातील उत्पादकांनी पाहावं. सरकार त्यांच्यासोबत ठामपणे उभे असेल, असेही मोदींनी सांगितले.
संबंधित बातम्या:
PM Modi speech: ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका प्रयास’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी घोषणा
PM Modi Speech : जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होतील : मोदी