Marathi News Business PM Ujjwala Yojana 2.0: India to be smoke free, 1 crore families to get free gas connection from today
PM Ujjwala Yojana 2.0 : भारत धूरमुक्त होणार, आजपासून 1 कोटी कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार
पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 8 कोटी गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. उज्ज्वला योजना 2.0 मध्ये एक कोटी नवीन कुटुंबांना गॅस कनेक्शन वितरित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेय.
1 / 5
PM Ujjwala Yojana 2.0 : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 लाँच करतील. या टप्प्यात 1 कोटी नवीन कुटुंबांना गॅस जोडणी दिली जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर प्रदेशातील महोबा येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 8 कोटी गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. उज्ज्वला योजना 2.0 मध्ये एक कोटी नवीन कुटुंबांना गॅस कनेक्शन वितरित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेय.
2 / 5
उज्ज्वला योजनेसंदर्भात पंतप्रधान मोदींनी 9 ऑगस्ट रोजी एक ट्विट केले होते, ज्यात ते म्हणाले, या योजनेचा पहिला टप्पा मे 2016 मध्ये सुरू करण्यात आला. ऑगस्ट 2019 मध्ये आम्ही 80 दशलक्ष गॅस कनेक्शनचे वितरण पूर्ण केले, जे लक्ष्य वेळेच्या सात महिने अगोदर होते. जेव्हा मे 2016 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली, तेव्हा 5 कोटी बीपीएल श्रेणीतील कुटुंबांमध्ये ती वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
3 / 5
एप्रिल 2018 मध्ये हे लक्ष्य वाढवून 8 कोटी करण्यात आले. यासह इतर सात श्रेणी देखील समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. एससी/एसटी, पीएमएवाय, एएवाय, सर्वाधिक मागासवर्गीय, टी गार्डन, वनवासी आणि आइसलँड हे सात श्रेणींमध्ये समाविष्ट होते.
4 / 5
अर्थसंकल्प 2021-22 मध्ये सरकारने पीएमयूवाय योजनेचा लाभ आणखी एक कोटी कुटुंबांना देण्याची घोषणा केली होती. सरकारने एक कोटी गॅस कनेक्शन डिपॉझिट मोफत देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्या गरीब कुटुंबांचा समावेश केला जाईल जे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट नव्हते.
5 / 5
उज्ज्वला 2.0 च्या लाभार्थी कुटुंबांना पहिल्यांदा मोफत भरलेले गॅस सिलिंडर मिळणार आहे. याशिवाय, नावनोंदणी प्रक्रिया अधिक सोपी आणि कमी कागदोपत्री ठेवण्यात आली आहे. स्थलांतरित कामगारांना याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही.