नवी दिल्लीः PMKVY Scheme details: प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) सुरू झाल्यापासून यंदा 10 जुलैपर्यंत 1.37 कोटी उमेदवारांनी या योजनेंतर्गत नोंदणी केलीय, अशी माहिती सरकारने दिलीय. ही योजना 700 हून अधिक जिल्हे आणि 37 भागांत राबविली गेलीय. कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, या योजनेंतर्गत या कालावधीत सुमारे 1.29 कोटी उमेदवार प्रशिक्षित आहेत.
“पीएमकेव्हीवाय अंतर्गत, 10 जुलै 2021 पर्यंत, ही योजना सुरू झाल्यापासून 700 हून अधिक जिल्ह्यांत 137 लाख उमेदवारांची नावनोंदणी करण्यात आली,” असे त्यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. कौशल्य विकासाद्वारे भारतीय तरुणांना सशक्त बनवण्याचा हेतू आहे. स्किल इंडिया मिशन अंतर्गत मंत्रालय आपली प्रमुख योजना पीएमकेव्हीवाय राबवित आहे, ज्यामध्ये शॉर्ट टर्म ट्रेनिंग (STT) आणि प्रीमियर लर्निंग (RPL) चे दोन घटक आहेत.
10 जुलैपर्यंत 10,641 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय वाटपाच्या तुलनेत 8,805.82 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. दुसर्या उत्तरामध्ये ते म्हणाले की, पीएमकेव्हीवायच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत देशभरात आठ लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे.
भारत सरकारची प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) जुलै 2015 मध्ये सुरू करण्यात आली. जे लोक कमी शिक्षित आहेत किंवा ज्यांनी शाळा सोडल्या आहेत, अशा लोकांना रोजगार पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्व तरुणांना संघटित करणे आणि त्यांची कौशल्ये सुधारणे आणि त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जास्तीत जास्त लोकांना या योजनेत सामील होण्यासाठी तरुणांना कर्ज घेण्याची सुविधा देखील आहे.
या योजनेत तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठी नोंदणी केली जाते. कोर्स संपल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र संपूर्ण देशात वैध आहे. तरुणांना कोणतेही प्रशिक्षण शुल्क भरावे लागत नाही, फी सरकारच भरते. या योजनेंतर्गत बहुतेक कमी शिक्षित किंवा माध्यमिक शाळा सोडलेल्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. कोणतीही स्वारस्य असलेली व्यक्ती पीएमकेव्हीवायसाठी http://pmkvyofficial.org येथे भेट देऊन अर्ज करू शकते.
संबंधित बातम्या
सरकार पेन्शन नियमात बदल करण्याच्या तयारीत, जाणून घ्या, फायदा कसा मिळणार?
PMKVY Scheme: So far 1.37 crore youth have been registered, training is available in 37 different fields