मुंबई : स्वस्तात किंवा परवडेल अशा किंमतीत घर किंवा दुकान खरेदी करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. स्वस्तार घर आणि दुकान घेण्यासठी पंजाब नॅशनल बँकेची तुम्हाला चांगली मदत होऊ शकते. कर्जात डुबलेली रक्कम परत मिळवण्यासाठी पीएनबी बँक त्यांच्याकडे गहाण असलेल्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. यामध्ये 6 हजार 350 रेसिडेन्शिअल, 1 हजार 691 कमर्शिअल, 922 इंडस्ट्रियल आणि 14 अॅग्रीकल्चर प्रॉपर्टीचा समावेश आहे. ही सर्व मालमत्ता डिफॉल्ट लिस्टमध्ये आली आहे. पीएनबी बँकेने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे (PNB e auction get reasonable prices of residential and commercial property).
PNB चं ट्विट नेमकं काय?
“तुम्ही या संधीला मिस करणार नाही. ही संधी खरंच हातातून निसटण्याआधी पकडून घ्या. येत्या 15 मार्चला आयोजित होणाऱ्या पीएनबीच्या ई-लिलावात सहभागी होऊन रेजिडेंशियल आणि कमर्शिअल प्रॉपर्टीला स्वस्तात खरेदी करा. अधिक माहितीसाठी https://ibapi.in या वेबसाईटला भेट द्या”, असं पीएनबी बँकेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर म्हटलं आहे (PNB e auction get reasonable prices of residential and commercial property).
पीएनबी बँक ज्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे त्याबाबत तुम्ही ibapi.in वरही माहिती मिळवू शकता. तुम्हाला खरंच ई-लिलावात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही बँकेत देखील जाऊन याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकता.
You won’t want to miss this!?
Grab the opportunity before it slips away. Get reasonable prices of residential and commercial property through PNB e-Auction being held on 15th March 2021.
To know more, visit e-Bikray Portal: https://t.co/N1l10s1hyq pic.twitter.com/Jkw8mXiWta
— Punjab National Bank (@pnbindia) March 14, 2021
लिलावात सहभागी कसं व्हायचं?
या लिलावात सहभागी होण्यासाठी तुम्ही ऑनलाईन देखील अर्ज करु शकता. तसेच बँकेत KYC च्या संपूर्ण माहितीसाठी सर्व कागदपत्रे जमा करावे लागतील. तसेच ई-लिलावात सहभागी होण्यासाठी अर्नेन्ट मनी डिपॉझिट म्हणजेच EMD जमा करावं लागेल. त्याचबरोबर डिजीटल सिग्नेचर जरुरी असेल. EMD आणि KYC संबंधित डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्हाला ई-मेलद्वारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. त्याद्वारे तुम्ही लिलावात सहभागी होऊ शकता.
हेही वाचा : Special report : पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी खेळी, 4 खासदार मैदानात, काय आहे शाहनीती?