PNB बँकेची जबरदस्त ऑफर, स्वस्तात घर खरेदीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

| Updated on: Jun 14, 2021 | 3:09 PM

जर तुम्हीही स्वस्त दरात घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुमच्यासाठी चांगली संधी आणली आहे. (PNB Mega e-auction for properties)

PNB बँकेची जबरदस्त ऑफर, स्वस्तात घर खरेदीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार
Home
Follow us on

PNB Mega e-Auction मुंबई : आपल्यातील अनेकजण सध्या स्वस्त दरात घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. जर तुम्हीही स्वस्त दरात घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुमच्यासाठी चांगली संधी आणली आहे. पीएनबीतर्फे येत्या 15 जूनला काही मालमत्तांचे डिजीटल लिलाव केले जाणार आहेत. यात गृहनिर्माण, निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा अनेक प्रकारच्या मालमत्तांचा समावेश असेल. (PNB Mega e-auction for properties Check other details here)

पीएनबीची ट्वीट करत माहिती

जर तुम्हीही स्वस्त आणि योग्य घराच्या शोधात असाल तर तुम्ही PNB Mega e-Auction सहभागी व्हा. यात तुम्हाला कमी किंमतीत व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता मिळू शकते. नुकतंच पंजाब नॅशनल बँकेने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

सर्व माहिती IBAPI वर उपलब्ध 

हा लिलाव कधी, किती वाजता होईल, याची संपूर्ण माहिती इंडियन बँक लिलाव तारण मालमत्ता माहिती म्हणजेच IBAPI वर उपलब्ध आहेच. भारतीय बँक असोसिएशनने याची स्थापना केली आहे.

येत्या 30 दिवसांत अनेक मालमत्तांचे लिलाव

वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) या प्लॅटफॉर्मवर तारण मालमत्तांसाठी ई-लिलावाची सुविधा देते. यात ज्या बँकांना मालमत्तांचा लिलाव करायचा आहे, ते या व्यासपीठावर जाऊन त्याची माहिती शेअर करतात.

या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, येत्या सात दिवसांत 405 निवासी मालमत्ता, 165 व्यावसायिक मालमत्ता आणि 88 औद्योगिक मालमत्तांचा लिलाव होणार आहे. तसेच 860 निवासी मालमत्ता, 321 व्यावसायिक मालमत्ता आणि 165 औद्योगिक मालमत्तांचा लिलाव येत्या 30 दिवसांत लिलाव होण्याची शक्यता आहे.

(PNB Mega e-auction for properties Check other details here)

संबंधित बातम्या : 

Business Idea | 10 हजारांची गुंतवणूक, दरमहिना 30 हजारांची कमाई, घरबसल्या सुरु करा ‘हा’ बिझनेस

NPS योजनेत आता मिळणार जास्त नफा, पैसे काढण्याच्या नियमातही बदल होणार

बँक ऑफ बडोदाची खास योजना, 100 रुपयांत सुरु करा अकाऊंट, उत्त्पन्नवाढीसह करातही सवलत