पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड ही एक नॉन डिपॉझिट टेकिंग प्रणालीगतदृष्ट्या महत्त्वपूर्ण बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी/NBFC) आहे. ती ग्राहकांवर आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) फायनान्सवर लक्ष केंद्रित करणारी कंपनी आहे. पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक तिमाहीचे आणि वर्षाचे त्यांचे ऑडिट केलेले परिणाम आज जाहीर केले. कंपनीने मजबूत आर्थिक कामगिरी नोंदवली असून कंपनीने व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट/AMU) मध्ये मजबूत वाढ, नफा आणि उत्कृष्ट मालमत्ता गुणवत्ता दर्शवली आहे.
आर्थिक वर्ष 24 च्या चवथ्या वित्तीय तिमाहीचे (Q4FY24) प्रमुख ठळक मुद्दे:
मालमत्ता (ॲसेट्स):
आतापर्यंतचे सर्वाधिक त्रैमासिक वितरण: 9,688 कोटींचे आतापर्यंतचे सर्वोच्च तिमाही वितरण गाठले, वार्षिक (YoY) 52% आणि तिमाही दर तिमाही (QoQ) 11% ने वाढले. व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट/AMU): 25,003 कोटी होती, वार्षिक (YoY) 55% आणि तिमाही दर तिमाही (QoQ) 14% ने वाढली.
मालमत्ता गुणवत्ता (ॲसेट क्वालिटी):
सकल नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (ग्रॉस नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स/NPA) 1.16% वर, वार्षिक 28 आधार बिंदू (बेसिस पॉइंट्स/bps) आणि तिमाही दर तिमाही 17 आधार बिंदू (बेसिस पॉइंट्स/bps) ने कमी निव्वळ नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (नेट नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स/NPA) 0.59 वर, वार्षिक 19 bps आणि तिमाही दर तिमाही 11 bps ने कमी
नफा:
करानंतरचा नफा (प्रॉफिट आफ्टर टॅक्स/PAT): आर्थिक वर्ष ’24 मध्ये 1027 कोटींचा सर्वाधिक वार्षिक PAT (प्रॉफिट आफ्टर टॅक्स / करानंतरचा नफा), वार्षिक (YoY) 83% वाढ आणि ₹332 कोटींचा सर्वाधिक त्रैमासिक PAT, तिमाही दर तिमाही (QoQ) 25% ने वाढला
मालमत्तेवर परतावा (रिटर्न ऑन ॲसेट्स/ RoA) 5.73% वर असून तो वार्षिक 73 bps ने आणि तिमाही दर तिमाही 42 bps ने वाढला. निव्वळ व्याज लाभ (नेट इंटरेस्ट मार्जिन/NIM) 11.06% वर होते, तिमाही दर तिमाही 4 bps ने वाढले.
संचालन खर्च (ऑपेरेटिंग एक्सपेंस/Opex) ते व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट/AMU) गुणोत्तर: आर्थिक वर्ष ‘24 च्या चवथ्या वित्तीय तिमाहीत (Q4FY24) मध्ये 3.99% वर होते, 144 bps ने वार्षिक आणि 1 bps ने तिमाही दर तिमाही कमी झाले.
संचालन नफा (ऑपेरेटिंग प्रॉफिट/PPOP): आर्थिक वर्ष ‘24 च्या चवथ्या वित्तीय तिमाहीसाठी (Q4FY24) ₹ 409 कोटी होते, वार्षिक 93% आणि तिमाही दर तिमाही 17% ने वाढले.
भांडवल पर्याप्तता आणि तरलता (कॅपिटल ॲडीक्वेसी एंड लिक्विडिटी) भांडवल पर्याप्तता प्रमाण 33.8% वर होते. तरलता बफर ₹ 3,932 कोटी वर होते.
या परिणामांवर भाष्य करताना, पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुतडा म्हणाले, “मला गेल्या तीन वर्षांच्या प्रवासाबद्दल आनंद आणि अभिमान वाटतो. या तीन वर्षांत नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) च्या क्षेत्रात कधी नव्हे एवढे बदल झाले आहेत. पूनावाला फिनकॉर्पच्या सर्वात मोठ्या परिवर्तनाचे नेतृत्त्व करताना मला अत्यंत आनंद वाटतो. आमची कामाप्रती दृढता आणि अंमलबजावणीप्रती उत्कृष्टता असते. त्यामुळे आम्ही सतत स्वतःला पुढे घेऊन गेलो आहोत आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परिणामी आम्ही AMU ने ₹ 25,000 कोटी आणि PAT ने ₹ 1000 कोटी ओलांडण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. आमची डिफरेंशिएटेड स्ट्रेटेजी आणि अथक अंमलबजावणी सर्व व्यवसाय मेट्रिक्सवर दिसून येते आणि त्याने कर्ज देण्याच्या क्षेत्रात आम्हाला एक महत्वपूर्ण नेतृत्त्व म्हणून स्थापित केले आहे.”