मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या पडझडीतून शेअर बाजार सावरल्याचे चित्र आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पहायला मिळाली. आज सेन्सेक्स तब्बल सातशे अंकानी वधारला आहे. बँकिंग, ऑटोमोबाईल, मेटल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. एचडीएफसी, इन्फोसिस, यांचे शेअर्स टॉपवर आहेत. सध्या स्थितीमध्ये सेन्सेक्स 487 अकांच्या वाढीसह 57,552 अंकांवर स्थिरावला आहे. तर दुसरीकड निफ्टीमध्ये देखील 147 अकांची वाढ झाली आहे.
शेअर्समधील खरेदी वाढत असून, गुंतवणूकदार बँकिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला सर्वाधिक पसंती देत आहेत. याचाच परिणाम म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी असल्याचे पहायाला मिळत आहे. त्या पाठोपाठ बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक देखील वाढली आहे. बँकिंग क्षेत्रातील शेअर 1.48 टक्क्यांनी वाढले आहेत.
दरम्यान गेल्या आठवड्यात ओमिक्रॉनच्या सावटाखाली जागतिक शेअरबाजार झाकोळून गेला होता. ओमिक्रॉनच्या बातम्यांमुळे सेन्सेंक्समध्ये मोठी पडझड झाल्याची पहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये तब्बल 16 हजार अंकांची घसरण झाली होती. परंतु मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये या आठवड्यात शेअरबाजारासाठी दिलासादायक वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच. सेन्सेक्समध्ये तब्बल 700 अंकांची वाढ पहायला मिळाली.
ज्या भारतीय सीईओंचा जगभर डंका; ते अग्रवाल, नाडेला, पिचाई नेमके कमवतात किती?
दिलासा नाहीच! गॅस सिलिंडर पुन्हा महागले; आता मोजावी लागणार इतकी किंमत