मुंबई: अलीकडच्या काळात गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी जुन्या पिढीतील लोक सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवून देणाऱ्या योजनांना प्राधान्य देतात. अशा गुंतवणुकीच्या योजनांमध्ये किसान विकास पत्राचा (KVP) वरचा क्रमांक लागेल. या योजनेत तुमचे पैसेही सुरक्षित राहतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला दुप्पट परतावा मिळेल.
किसान विकास पत्र ही भारत सरकारची एक वेळची गुंतवणूक योजना आहे, जिथे तुमचे पैसे एका निश्चित कालावधीत दुप्पट केले जातात. किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. योजनेचा परिपक्वता कालावधी सध्या 124 महिने आहे. यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. ही योजना खास शेतकर्यांसाठी बनवण्यात आली आहे, जेणेकरून ते त्यांचे पैसे दीर्घकाळ वाचवू शकतील.
किसान विकास पत्र (KVP) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे असावे. वैयक्तिक खात्याव्यतिरिक्त, संयुक्त खात्याचीही सुविधा आहे. त्याचवेळी, ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे, ज्याची पालकांनी काळजी घ्यावी. ही योजना हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजेच HUF किंवा NRI वगळता ट्रस्टसाठी देखील लागू आहे. किसान विकास पत्र (KVP) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपयांपर्यंतचे प्रमाणपत्र उपलब्ध असतात.
2021 च्या पहिल्या तिमाहीत KVP साठी व्याज दर 6.9 टक्के निश्चित करण्यात आला आहे. येथे तुमची गुंतवणूक 124 महिन्यांत दुप्पट होईल. तुम्ही एक लाख रुपये एकरकमी गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 2 लाख रुपये मिळतील. या योजनेचा परिपक्वता कालावधी 124 महिन्यांचा आहे. ही योजना आयकर कायदा 80C अंतर्गत येत नाही. त्यामुळे जो कोणताही परतावा येईल त्यावर कर आकारला जाईल. या योजनेत टीडीएस कापला जात नाही.
किसान विकास पत्र जारी केल्याच्या तारखेपासून अडीच वर्षांनी कॅश केले जाऊ शकते. KVP एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील हस्तांतरित केले जाऊ शकते. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते. KVP मध्ये नामांकन सुविधा उपलब्ध आहे. किसान विकास पत्र पासबुकच्या स्वरूपात जारी केले जाते.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, KVP अर्ज फॉर्म, पत्ता पुरावा आणि जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे.
इतर बातम्या:
Petrol Diesel Price: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा दर
पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात का, जाणून घ्या सर्वकाही
शेतकऱ्यांना आता विनातारण 1.60 लाखांचे कर्ज मिळणार, जाणून घ्या सर्वकाही