येत्या काही वर्षात भारतामध्ये जुन्या वाहन बाजारांमध्ये(Pre Owned Vehicle Market) जोरदार तेजी पाहायला मिळू शकते. 2026 पर्यंत हा बाजार दुप्पट होण्याची दाट शक्यता आहे. निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांनी नवीन वाहनांकडे कमालीची पाठ फिरवली आहे. एकतर बुकींग करुन कारसाठी बरेच महिने वाट पाहत बसावे लागते. दुसरीकडे वाढत्या किंमतींमुळे नवीन वाहन खरेदी जिकरीची झाली आहे. परिणामी देशात . एकूण कार मार्केटमध्ये जून्या वाहन बाजाराचा शेअर कमालीचा वाढला आहे. ग्रँट थोर्टन इंडिया ( grant thornton india) या कन्सल्टिंग फर्मनुसार जुन्या कार विक्रीत कमालीची वाढ होऊन हा बाजार दुप्पट होऊ शकतो.
अहवालानुसार, भारतामध्ये जुन्या वाहन वाहन बाजारांमध्ये 2026 पर्यंत बाय 82 लाख कार विक्रीची उलाढाल होऊ शकते. मार्च 2021 मध्ये हाच आकडा 40 लाख विक्रीपर्यंत पोहचला आहे. रिपोर्टनुसार जुन्या वाहनांचा बाजार वाढत आहे. यामागे छोट्या शहरांमधील जुने वाहनांची वाढती मागणी, नवीन वाहनांची वाढत्या किमती आणि ग्राहकांनी जुन्या वाहन खरेदीकडे वळविलेला मोर्चा ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. यामध्ये वार्षिक चक्रवाढ दर 14.1 टक्क्याची तेजी लक्षात घेता 2030 पर्यंत जून्या वाहन विक्रीचा व्यवसाय 70.8 अरब डॉलर होण्याची दाट शक्यता आहे.
नवीन वाहनांच्या वाढत्या किंमतीचा आधार
अहवालानुसार नवीन वाहनांच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे भारतीय ग्राहक पुन्हा जून्या वाहनांकडे वळले आहेत. ग्रँट ऑर्टन भारत, या संस्थेचे प्रमुख सहभागीदार साकेत मेहरा यांनी सांगितले की, जुन्या वाहनांकडे ग्राहक जास्त आकर्षीत झाले असून छोट्या शहरातून जुन्या वाहनांची मागणी वाढली आहे. सध्या ही मागणी 55 टक्के असून पुढील चार वर्षात जून्या वाहनांची मागणी 70 टक्के होण्याची शक्यता आहे.
सेमीकंडक्टरची इष्टापती
सध्या मार्केटमध्ये चीप (Chip)अथवा सेमीकंडक्टर(SemiConductor) उपलब्ध नसल्याचे संकट प्रभावी ठरत आहे. नवीन कारसाठी लांबलचक वेटिंग असून लोक कंटाळून बुकिंग रद्द करत आहे. ओमायक्रॉनच्या (Omicron ) नवीन संकटाची चाहूल गडद होत असून त्याचा चीप आणि सेमीकंडक्टर उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे नवीन कारसाठी ग्राहकांना आणखी काही महिने वेटिंग करावे लागेल. ही परिस्थिती अशीच तर नवीन कार उत्पादनाला ब्रेक लागण्याची भीती आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (federation of automobile dealers association-FADA)माहितीनुसार ओमायक्रॉनचे संकट जर वाढले तर परिस्थिती अजून बिकट होईल आणि कार उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होईल. सेमीकंडक्टर अभावी सध्या सर्वसाधारण वाहन बाजाराच्या विक्रीत नोव्हेंबर महिन्यात 19 टक्क्यांची घट नोंदविण्यात आलेली आहे.
संबंधित बातम्या :
डिसेंबर महिन्यात बंपर धमाका, कार खरेदीवर मिळवा घसघशीत डिस्काऊंट; अवघ्या 3.14 लाखांपासून सुरुवात