नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) असोचॅम (असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया) च्या फाऊंडेशन वीकच्या निमित्ताने बोलणार आहेत. गुरुवारी पीएमओच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली. त्यामुळे मोदी आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. (prime minister modi honoring ratan tata and address to assochams foundation week today)
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी फाउंडेशन सप्ताच्या निमित्ताने रतन टाटा यांना ‘असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अवॉर्ड’ देखील प्रदान करणार आहेत. टाटा समूहाच्या वतीने ते हा पुरस्कार घेतील. या खास सोहळ्याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
Prime Minister Narendra Modi to deliver keynote address at ASSOCHAM (Associated Chambers of Commerce of India) Foundation Week today, through video conferencing. pic.twitter.com/U2xlLAL92q
— ANI (@ANI) December 18, 2020
असोचॅमची (ASSOCHAM) स्थापना 1920 मध्ये देशातील सर्व प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे प्रवर्तक मंडळे यांनी केली होती. या संस्थेमध्ये 400 हून अधिक चेंबर्स आणि कामगार संघटनांचा समावेश आहे. देशभरात याचे साडेचार लाखाहून अधिक सभासद आहेत. ही संस्था प्रामुख्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली गेली. यामुळे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. (prime minister modi honoring ratan tata and address to assochams foundation week today)
इतर बातम्या –
मुकेश अंबानींना आतापर्यंतचं सर्वात मोठं यश, अखेर कोरोना काळातच ‘हे’ स्वप्न पूर्ण
दरवर्षी 75 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात; जाणून घ्या मोदींची विशेष योजना
(prime minister modi honoring ratan tata and address to assochams foundation week today)