नवी दिल्ली : वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील काही प्रमुख शहरातील हवा प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिवाळीच्या काळात दिल्लीमधील हवेचा एअर क्वॉलेटी इंडेक्स हा तब्बल चारशे पेक्षा देखील पुढे गेला होता. अशा परिस्थितीमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पेट्रोल,डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घातली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र पेट्रोल, डिझेलच्या वाहनांवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार नाही, परंतु हवा प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. ते इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना गडकरी यांनी म्हटले आहे की, देशात वाहानामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ते कमी करण्यासाठी आता इलेट्रीक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. इलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती करण्यासाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मितीवर देखील भर देण्यात आला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, पेट्रोल. डिझेलच्या वाहनांवर बंदी आणली जाईल, पेट्रोल डिझेलच्या वाहनांची निर्मिती सुरूच राहणार असल्याचे यावेळी गडकरींनी सांगितले.
दरम्यान गडकरी यांच्या हस्ते मारूती सुझुकीच्या स्क्रॅपिंग सेंटरचे उद्घाटन देखील करण्यात आले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, मारूतीने सुरू केलेले हे स्क्रॅपिंग सेंटर देशातील पहिले स्क्रॅपिंग सेंटर आहे. केंद्राने नुकतीच स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर केली आहे. या पॉलिसीनुसार आपली जुनी वाहने स्क्रॅप करणाऱ्यांना नवे वाहन खरेसाठी प्रोहोत्साहनपर सूट देण्यात येईल. तसेच स्क्रॅपिंग सेंटरमुळे येणाऱ्या काळात दोन लाखांपेक्षा अधिक रोजगाराची निर्मिती होऊ सकते.
साखर उद्योगाला दिलासा; 303 मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला परवानगी
भारतीय रेल्वे कात टाकतेय! आता तुम्ही ट्रेनही घेऊ शकता भाड्यानं, रेल्वे मंत्र्यांची भारत गौरवची घोषणा
पीएफ हस्तांतरण झाले सोपे; ‘ईपीएफओ’चा मोठा निर्णय, खासगी कर्मचाऱ्यांना दिलासा