नवी दिल्ली- दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) खात्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. पीपीएफची गणना छोट्या गुंतवणुक योजनांमध्ये केली जाते. जानेवारी-मार्च तिमाहीत वार्षिक 7.1 टक्के व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. वर्ष 2021 मिळणाऱ्या व्याजदर सापेक्ष पीपीएफवरील व्याजदर स्थिर आहे. पीपीएफ ही भारतातील लोकप्रिय बचत योजनांपैकी प्रमुख योजना आहे. केंद्र सरकारच्या कक्षेतील योजना असल्याने गुंतवणुकीचे सुरक्षित आणि विश्वासार्ह साधन मानले जाते. (public provident fund investment most safe and reliable get 7.1% return)
किमान व कमाल ठेव-
बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये PPF खाते उघडले जाऊ शकते. पीपीएफमध्ये एका वित्तीय वर्षात किमान 500 आणि कमाल 1.5 लाखांची गुंतवणूक केली जाऊ शकते. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असतो. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद केले जाऊ शकत नाही. मात्र, काही विशेष परिस्थिती यासाठी अपवाद ठरू शकतात. पीपीएफ नियमात वर्ष 2016 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. आपत्कालीन वैद्यकीय स्थिती, मुलांचे उच्च शिक्षण आदी कारणांसाठी वेळेपूर्वीच खाते बंद केले जाऊ शकते.
PPF (पीपीएफ) दृष्टीक्षेपात:
o योजनेचे नाव- सामाजिक भविष्य निर्वाह निधी
o परतावा दर(वार्षिक) – 7.1%
o लॉक-इन कालावधी- 15 वर्षे
o किमान गुंतवणूक (प्रति वर्ष)- 500 रुपये
o कमाल गुंतवणूक (प्रति वर्ष)- 1.5 लाख रुपये
o कर लाभ- कलम 80 –सी अंतर्गत गुंतवणूक कर पात्र
PPF खाते कुणासाठी?
PPF खाते (Public Provident Fund Account) उघडण्यासाठी भारतीय नागरीक असण्याची प्राथमिक अट आहे. अल्पवयीन बालकाच्या नावे देखील खाते उघडले जाऊ शकते. मात्र, PPF खात्यात संयुक्त खात्याची तरतूद नाही. मात्र, अन्य कुणाला खात्यासाठी नामनिर्देशित केले जाऊ शकते. कुणीही व्यक्ती आपल्या नावावर एकाधिक खाते उघडू शकत नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिस किंवा बँक यापैकी एक पर्याय निवडावा लागेल.
PPF खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
o PPF खाते उघडण्याचा फॉर्म
o तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो
o ओळखपत्र ( कोणतेही वैध ओळखपत्र जसे पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / आधार कार्ड )
o पत्त्याचा पुरावा ( कोणताही निवास पुरावा. पासपोर्ट / वीज बिल / रेशन कार्ड / बँक पासबुक )
Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे ‘ही’ प्रमुख तीन कारणं
साडे दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले?, आगार प्रमुखांकडून रुजू करुन घेण्यास नकार!
Breaking : पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण! मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन
(public provident fund investment most safe and reliable get 7.1% return)