नवी दिल्ली : रेल्वे भरती मंडळाच्या म्हणजेच RRB च्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अर्थात NTPC (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी) च्या लेव्हल-1 परीक्षेचा निकाल 15 जानेवारीपर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिलीय. RRB ने एक लाखाहून अधिक नोकऱ्या देण्यासाठी जानेवारी 2019 मध्ये रिक्त जागा काढल्या होत्या.
या सर्व पदांसाठीची भरती प्रक्रिया डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होईल, असा दावा रेल्वेने केला होता. परंतु सुमारे अडीच कोटी अर्ज आणि नंतर कोविड 19 ने ही भरती प्रक्रिया अनेकवेळा रुळावरून घसरली आणि ही नोकरी किती काळ दिली जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे परीक्षार्थींव्यतिरिक्त राजकीय पातळीवरही अनेक वेळा प्रश्न उपस्थित झालेत.
रेल्वे भरती बोर्डाने जानेवारी 2019 मध्ये सुमारे 1.5 लाख पदांसाठी भरती जारी केली होती. रेल्वेत ही जागा 4 वर्षांनंतर आली, त्यामुळे 2 कोटी 40 लाखांहून अधिक अर्ज आले. जानेवारी 2019 मध्ये RRB ने गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणीसाठी 35281 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या होत्या. त्याअंतर्गत स्टेशन मास्तर, गार्ड, कमर्शियल क्लार्क, सामान्य लिपिक, ट्रेन क्लार्क अशा पदांवर नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. मात्र इतक्या पदांसाठी रेल्वेकडे 12630885 अर्ज आलेत.
यासाठी रेल्वेने CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट घेतली. कोविड 19 मुळे या परीक्षेवर परिणाम झाला. ही परीक्षा 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 208 शहरांमध्ये 8 टप्प्यांत घेण्यात आली. यापैकी 7 टप्प्यांची परीक्षा कोविडपूर्वी घेण्यात आली होती.
या परीक्षेतील कोणत्याही प्रश्नाशी संबंधित आक्षेपही रेल्वेने मागवलेत. 18.08.21 ते 23.08.21 पर्यंत रेल्वेला 93263 प्रश्नांबाबत ऑनलाईन हरकती प्राप्त झाल्यात. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. यापैकी योग्य त्याप्रमाणे चुकीचे प्रश्न काढून एकूण गुण जोडले जातील. त्यानंतरच दुसऱ्या टप्प्याची गुणवत्ता यादी 15 जानेवारीला प्रसिद्ध होईल. त्यानंतर उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ट टेस्टसाठी बोलावले जाईल. लेव्हल-2 च्या निकालानंतर वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतरच यशस्वी उमेदवाराला नोकरी दिली जाईल.
रेल्वेतील सर्वात मोठी रिक्त जागा एक लाख (103769) पेक्षा जास्त पदांसाठी काढण्यात आली. या अंतर्गत सर्व विभागीय रेल्वे आणि रेल्वेच्या उत्पादन युनिटमध्ये भरती केली जाणार आहे. यासाठी रेल्वेकडे 1 कोटीहून अधिक (11567284) अर्ज आलेत. मात्र ऑनलाईन केलेल्या या अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिकदृष्ट्या चुकीची छायाचित्रे आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे सुमारे साडेपाच लाख (548829) अर्ज रद्द करण्यात आलेत.
यावरून वाद झाल्यानंतर हे प्रकरण CAT म्हणजेच केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणापर्यंत पोहोचले. CAT च्या आदेशानंतर रेल्वे 15 डिसेंबर 2021 पर्यंत अशा उमेदवारांना ऑनलाईन लिंक देणार आहे. यावर तांत्रिकदृष्ट्या चुकीचा फोटो किंवा सही बदलता येते. त्यानंतरच यशस्वी अर्जदारांची यादी अंतिम होईल आणि या पदांसाठीची भरती प्रक्रिया पुन्हा रुळावर येईल.
संबंधित बातम्या
Amazon वर Xiaomi flagship days sale सुरु, अनेक दमदार स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी
Digital Payments : यूपीआय अॅपवरचे व्यवहार होणार महाग? आरबीआयनं काय तयारी केलीय? वाचा…