बाबा रामदेव यांचे एका झटक्यात 2300 कोटी रुपये बुडाले, कारण…

| Updated on: Feb 28, 2024 | 2:35 PM

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे परिणाम बुधवारी शेअर बाजारात दिसून आला. पंतजली फुडसच्या शेअरमध्ये चार टक्के घट झाली. एका दिवसापूर्वी कंपनीचे शेअर 1620.20 रुपयांवर होते. ते 1,535.00 पर्यंत खाली आले होते.

बाबा रामदेव यांचे एका झटक्यात 2300 कोटी रुपये बुडाले, कारण...
ramdev baba
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | दि. 28 फेब्रुवारी 2024 : योगगुरु आणि पंतजलीचे प्रमुख बाबा रामदेव यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांची कंपनी पंतजली फुडला फटकारले आहे. पंतजलीकडून करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये तथ्य नाही. यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. पंतजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांना अवमान नोटीस पाठवली आहे. जाहिरातींमध्ये चुकीचे दावे न करण्याच्या त्यांचे आश्वासन न पाळल्याबाबत अवमान नोटीस पाठवली. त्याचा परिणाम पंतजलीच्या शेअर्सवर झाला आहे. शेअर बाजारात पंतजलीचे शेअर्स 105 मिनिटांत घसरले. यामुळे बाबा रामदेव यांच्या कंपनीचे सुमारे 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

काय होता पंतजलीचा दावा

सुप्रीम कोर्टाने पतंजलीला हृदयविकार आणि दमा यासारखे आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करण्यासही मनाई केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) द हिंदू वृत्तपत्रातील पतंजलीची जाहिरात आणि पत्रकार परिषदेसह न्यायालयात पुरावे सादर केले. योगाच्या मदतीने मधुमेह (शुगर) आणि दमा पूर्णपणे बरा करण्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीकडून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत नाराजी व्यक्त केली. आता यासंदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. यापूर्वी कोविड-19 व्हॅक्सीन आणि आधुनिक औषधोपचारासंदर्भात पंतजलीकडून सुरु असलेल्या अभियानावर नोव्हेंबर महिन्यात कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच एक कोटी रुपये दंड लावण्याचा इशारा दिला होता.

हे सुद्धा वाचा

कंपनीच्या शेअरमध्ये 4 टक्के तोटा

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे परिणाम बुधवारी शेअर बाजारात दिसून आला. पंतजली फुडसच्या शेअरमध्ये चार टक्के घट झाली. एका दिवसापूर्वी कंपनीचे शेअर 1620.20 रुपयांवर होते. ते 1,535.00 पर्यंत खाली आले होते. यामुळे कंपनीचे 105 मिनिटात 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले. एक दिवसांपूर्वी मंगळवारी कंपनीचे मूल्य 58,650.40 कोटी रुपये होते. ते बुधवारी सकाळी 11 वाजता 56,355.35 कोटी रुपये झाले.