Ratan Tata : रतन टाटा यांनी कठीण काळात आयपीएलसाठी उघडला होता खजिना

| Updated on: Oct 10, 2024 | 8:48 PM

रतन टाटा यांनी जेव्हा टाटा समुहाची जबाबदारी घेतली त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही, त्यांनी त्यांच्या नेतृत्वात समुहाला उंचीवर नेऊन ठेवले. पण रतन टाटा यांनी देशाच्या प्रत्येक कठीण काळात सरकारला मदत केली. इतकंच नाही तर आयपीएल लीगसाठी ही त्यांनी त्यांचा खजिना खुला करुन दिला होता.

Ratan Tata : रतन टाटा यांनी कठीण काळात आयपीएलसाठी उघडला होता खजिना
Follow us on

वयाच्या ८६ व्या वर्षी उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने अनेक इतिहास रचले. टाटा समुहाने देशातील खेळाडूंना नेहमीच पाठिंबा दिला. रतन टाटा यांना खेळात खूप रस होता. त्याच्या मदतीने अनेक खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवले. बीसीसीआय आणि टाटा समूह यांच्यातील संबंधही मजबूत आहेत. जेव्हा भारताने चीनवर बहिष्कार टाकला. तेव्हा बीसीसीआय पुढे प्रश्न होता की, आयपीएलचे प्रायोजक कोण असेल.

टाटा समूहाने अनेकदा क्रिकेट स्पर्धांचे प्रायोजकत्व करत आहे. याची सुरुवात 1996 मध्ये टायटन कपने झाली, 2000 मध्ये टाटा ग्रुपने मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेटपासून स्वतःला दूर केले. पण 2020 मध्ये जेव्हा भारत-चीन सीमा वादादरम्यान IPL ने चीनी फोन कंपनी Vivo ला IPL च्या प्रायोजकत्वातून काढून टाकले तेव्हा टाटा समूहाने पुढे येत आयपीएल लीगला पाठिंबा दिला होता. 2024 च्या हंगामापूर्वी, टाटाने 2,500 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून चार वर्षांसाठी आयपीएलचे प्रायोजकत्व जिंकले होते. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली देखील होती.

रतन टाटा यांनी फक्त पुरुष क्रिकेटच नाही तर 2023 मध्ये जेव्हा बीसीसीआयने महिला प्रीमियर लीग सुरू केली तेव्हा देखील टाटा समूहाने त्याला प्रायोजित केले. रतन टाटा यांच्याकडे 2027 पर्यंत WPL चे प्रायोजकत्व देखील आहे. आज बीसीसीआयनेही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, ‘श्री रतन टाटा जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांचे नेतृत्व, सचोटी आणि समाजाप्रती समर्पण या वारशासाठी उल्लेखनीय मापदंड स्थापित केले. त्यांच्या प्रियजनांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. श्रध्दांजली, सर.’

पंजाबी गायक दिलजीत दोसांझ जर्मनीमध्ये लाइव्ह म्युझिक शो करत होते. जेव्हा त्यांना रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा त्यांनी त्यांचा शो मध्येच थांबवला. त्यांनी शो थांबवून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. मग ते म्हणाले की, आपण कठोर परिश्रम करावे, चांगले विचार करावे, कोणाच्या तरी उपयोगाचे व्हावे आणि आपले जीवन निर्दोषपणे जगून येथून निघून जावे, हे आपण त्यांच्या जीवनातून शिकू शकतो.