नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लक्ष्मी विलास बँकेनंतर (lakshmi vilas bank) आणखी एका बँकेवर निर्बंध घातले आहे. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Mantha Urban Cooperative Bank) निर्बंध घालण्यात आले आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या बँकेला काही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे 17 नोव्हेंबर 2020 रोजी बँकेचं कामकाज संपल्यानंतर, पुढच्या दिवसापासून सहा महिन्यांसाठी हे निर्बंध असतील. आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्याही अडचणी वाढणार आहेत. (rbi ban on jalna mantha urban cooperative bank stop withdrawal of funds)
या निर्देशांनुसार, आरबीआयच्या परवानगीशिवाय मंठा बँक कोणालाही कर्ज देऊ शकत नाही किंवा बँक कर्ज घेऊही शकत नाही. इतकंच नाही तर जुन्या कर्जांमध्ये नूतनीकरण करण्यासाठी बँक कुठलीही नवी गुंतवणूक करू शकत नाही. नवीन ठेवी स्विकारण्यावरही बँकेला निर्बंध घालण्यात आले आहे. तर हे निर्बंध नेमके का घातले गेले याविषयी आरबीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही.
खरंतर, गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (PMC) कथित घोटाळ्याची माहिती रिझर्व्ह बँकेला मिळाली होती. हा घोटाळा उघड होताच तातडीने बँकेवर निर्बंध घालण्यात आले होते. तर बँकेला संकटापासून वाचवण्यासाठी आरबीआयने 24 सप्टेंबर 2019 रोजी पैसे काढण्यासाठी मर्यादा किंवा मोरेटोरियम लागू केलं होतं. (rbi ban on jalna mantha urban cooperative bank stop withdrawal of funds)
लक्ष्मी विलास बँकेवरही निर्बंध
याआधीही खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेवर आर्थिक अडचणींमुळे महिनाभरासाठी निर्बंध घालण्यात आले होते. या निर्बंधांवेळी बँक खातेधारकांना फक्त 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मुभा होती. तर बँकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी आरबीयाने हा निर्णय घेतला होता.
केंद्र सरकारने बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 45 अन्वये खासगी क्षेत्रातील बँकांवर निर्बंध घातले आहे. यावर्षी अडचणीत आलेल्या येस बँकनंतर लक्ष्मी विलास ही खाजगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक होती. येस बँकेवर मार्चमध्ये निर्बंध घालण्यात आले होते. सरकारने यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) मदतीने येस बँक पुन्हा उभारली. येस बँकेच्या 45 टक्के भांडवलाच्या बदल्यात एसबीआयने 7,250 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. (rbi ban on jalna mantha urban cooperative bank stop withdrawal of funds)
इतर बातम्या –
‘ही’ बँक बचत खात्यावर महिलांना देते 7 टक्के व्याज, सोने कर्जावरही खास ऑफर
मोठा झटका! HDFC सह ‘या’ दोन बँकांनी FD व्याज दरात केली कपात, वाचा नवे दर
लक्ष्मी विलास बँकेतून महिन्याकाठी काढता येणार फक्त ‘एवढे’ रुपये, RBI ने लादले निर्बंध#centralgovernment #rbi #lakshmivilasbank https://t.co/xQUZSgZNZn
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020
(rbi ban on jalna mantha urban cooperative bank stop withdrawal of funds)