उस्मानाबादच्या वसंतदादा सहकारी बँकेचे लायसन्स रद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई

| Updated on: Jan 16, 2021 | 3:52 PM

उस्मानाबादमधील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यता आलं आहे. (RBI Cancels Licence Of Vasantdada Nagari Sahakari Bank, Osmanabad)

उस्मानाबादच्या वसंतदादा सहकारी बँकेचे लायसन्स रद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई
बिटकॉईन, डॉजकॉईन आता विसरून जा! आरबीआय लवकरच आणतेय डिजीटल चलन
Follow us on

मुंबई: उस्मानाबादमधील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यता आलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बँकेला आजपासून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. (RBI Cancels Licence Of Vasantdada Nagari Sahakari Bank, Osmanabad)

रिझर्व्ह बँकेने एक प्रेसनोट रिलीज करून वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 11 जानेवारीपासून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ही माहिती देताना बँकेचा परवाना रद्द करण्याची अनेक कारणंही दिली आहेत. बँकेची सध्याची वित्तीय स्थिती पाहता ही बँक ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात असमर्थ आहे, असं एक प्रमुख कारण आरबीआयने दिलं आहे. 2017मध्ये या बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घालूनही बँकेने वित्तीय स्थिती सुधारली नाही. त्यामुळे बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. या बँकेत हजारो ठेवीदारांच्या लाखो ठेवी आहेत.

बँकेचा परवाना रद्द झाल्याने आणि लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू झाल्याने बँके डिपॉझिटर्सला त्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू होईल, असंही आरबीआयने म्हटलं आहे. कोणत्याही बँकेच्या लिक्विडेशनवर बँकेच्या खातेदारांचे 5 लाख रुपयांपर्यंतची जमा सुरक्षित असते. याचा अर्थ बँकेत तुमचे कितीही पैसे जमा असले तरी तुम्हाला 5 लाखांपर्यतची तुमची रक्कम परत मिळणार आहे. डिआयसीजीसीकडून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहण्याची हमी मिळते.

99 टक्के खातेदारांना मिळणार फूल पेमेंट

वसंतदादा नागरी सहकारी बँकेतील 99 टक्क्याहून अधिक खातेदारांना त्यांची जमा रक्कम परत देण्यात येणार आहे. डीआयसीजीसीकडून ही रक्कम दिली जाणार आहे. खातेदारांना त्यांची जमा रक्कम देण्याची वसंतदादा नागरी सहकारी बँकेची वित्तीय स्थिती नाही. त्यामुळे डीआयसीजीसीकडून ही रक्कम दिली जाणार असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करणार

रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रच्या कमिशनर फॉर कॉर्पोरेशन आणि रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीला वसंतदादा बँकेचा कारभार आटोपण्याचे आदेश जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या बँकेची दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी लिक्विडेटरची नियुक्ती करण्याचे आदेशही आरबीआयने दिले आहेत.

या बँकांवरही कारवाई

आरबीआयने काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवान रद्द केला होता. त्याआधी जालन्यातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्यानंतर सातारा जिल्ह्यातील नावाजलेली ‘कराड जनता बँक’ दिवाळखोरीत गेल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेचा परवाना रद्द केला होता. कराड जनता बँक ही सातारा जिल्ह्यात एक नावाजलेली बँक आहे. सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या बँकेचे हजारो ठेवीदार आहेत. या बँकेवर 2017 साली रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. त्यानंतर आता ही बँक दिवाळखोरित गेल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ही अधिकृत घोषणा सहकार आयुक्तांनी केली होती. (RBI Cancels Licence Of Vasantdada Nagari Sahakari Bank, Osmanabad)

या बँकांचे परवाने रद्द

>> सुभद्रा लोकल एरिया बँक ( कोल्हापूर)

>> सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई)

>> मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (जालना)

>> कराड जनता बँक (सातारा)

>> जयभारत क्रेडिट लिमिटेड (मुंबई)

या बँकेने सरेंडर केलं

>> डिस्ट्रीब्यूटर्स (बॉम्बे) प्राइवेट लिमिटेड (मुंबई) (RBI Cancels Licence Of Vasantdada Nagari Sahakari Bank, Osmanabad)

 

संबंधित बातम्या:

कोल्हापूरच्या सुभद्रा एरिया लोकल बँकेचा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मिनिटांत कर्ज देणाऱ्या अ‍ॅपमुळे अनेकांनी केली आत्महत्या, RBI ने केलं अलर्ट

आता पण चालू शकते 1, 2 आणि 5 रूपयांची नोट? जर तुमच्या जवळ या नोटा असतील तर पाहा नियम

एकही रुपया खर्च न करता केवळ 5 मिनिटांत बनेल ‘पॅन कार्ड’, जाणून घ्या कसे…

(RBI Cancels Licence Of Vasantdada Nagari Sahakari Bank, Osmanabad)