नवी दिल्लीः RBI New Rule: जर तुम्ही चेकद्वारे पेमेंट करत असाल तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सावध राहावे लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग नियमांमध्ये काही बदल केलेत. मध्यवर्ती बँकेने आता 24 तास बल्क क्लिअरिंग सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतलाय, ज्याचा थेट परिणाम तुमच्या धनादेशाची रक्कम देण्यावर होणार आहे. म्हणजेच आता चेक क्लिअर होण्यास 2 दिवस लागणार नाहीत. आता चेक बँकेत टाकल्यानंतर त्याची रक्कम त्वरित मिळणार आहे. अशा परिस्थितीत चेक देताना आणि चेक देण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आहेत की नाही, याची काळजी घ्यावी लागेल.
आता NACH चेक सातही दिवशी उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे चेकद्वारे पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. आता ते नॉन वर्किंग डे म्हणजेच साप्ताहिक सुट्ट्या आणि राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीही काम करणार आहे. त्यामुळे आता चेक देण्यापूर्वी खात्यात पैसे आहेत की नाही ते तपासा. अन्यथा चेक बाऊन्स होईल. चेक बाऊन्स झाल्यास तुम्हाला खात्यातून दंड भरावा लागेल.
मोठ्या प्रमाणावर पैसे भरण्याचे काम NACH द्वारे केले जाते, जे भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे संचालित आहे. हे एकावेळी अनेक क्रेडिट ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. या व्यतिरिक्त वेतन, पेन्शन, व्याज, लाभांश इत्यादी मोठ्या प्रमाणात रक्कम दिली जाते. तसेच वीज, गॅस, टेलिफोन, पाणी, कर्जाचा हप्ता, गुंतवणूक, विमा प्रीमियम इत्यादी भरण्याचे काम करते.
RBI ने चेकवर आधारित व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी जानेवारीमध्ये सकारात्मक वेतन प्रणाली लागू केली. पॉझिटिव्ह पे सिस्टीममध्ये 50,000 रुपयांच्या वरील चेक पेमेंटसाठी तपशील पुन्हा तपासला जातो.
या प्रक्रियेअंतर्गत चेक जारीकर्ता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने क्लियरिंगसाठी सादर केलेल्या चेकमधून माहिती देतो. जसे की चेक नंबर, चेकची तारीख, चेक देणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक, रक्कम आणि इतर तपशील इ. जारीकर्त्याला पूर्वी दिलेल्या चेकचा तपशील देखील मिळतो.
संबंधित बातम्या
SBI चे Gold Loan घेणे पहिल्यापेक्षा सोपे, व्याजदर अन् कर्जाची पद्धत जाणून घ्या
देशातील ‘या’ 10 खासगी बँका, जिथे FD वर सर्वाधिक व्याज, तुम्हाला 6.5% पर्यंत परतावा
RBI changes rules! Do not make this mistake before paying the check, otherwise there will be a penalty