नवी दिल्लीः HDFC Bank Credit Card: ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला पुन्हा नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्याची परवानगी दिलीय. 8 महिन्यांच्या स्थगितीनंतर केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला. त्यानंतर एचडीएफसी बँकेने गेल्या एका महिन्यात 4 लाखांहून अधिक क्रेडिट कार्ड वितरित केलीत. येत्या काही दिवसांत बँकेने आपला वेग वाढवण्याची तयारी केलीय.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, 21 सप्टेंबरदरम्यान एचडीएफसी बँकेने ऑगस्टमध्ये बंदी उठवल्यापासून 4 लाखांहून अधिक नवीन क्रेडिट कार्ड जारी केलीत. जेव्हा HDFC Bank चा क्रेडिट कार्ड व्यवसाय स्थगित ठेवण्यात आला, तेव्हा बँक दरमहा सरासरी 3 लाख नवीन क्रेडिट कार्ड जारी करत होती. बँकेच्या योजनेनुसार, फेब्रुवारी 2022 पासून बँक दरमहा सरासरी 5 लाख नवीन क्रेडिट कार्ड जारी करेल.
एचडीएफसी बँकेचा बंदीपूर्वी क्रेडिट कार्ड बाजारात सुमारे 20 टक्के बाजार हिस्सा होता. असे मानले जाते की, आता ते वाढून 22-24 टक्के होईल. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँक येत्या काळात अनेक सुविधा आणि ऑफर घेऊन येत आहे. सह ब्रँड कार्ड सर्वात प्रमुख आहे. यामध्ये बँक फार्मा, ट्रॅव्हल, एफएमसीजी, हॉस्पिटॅलिटी, टेलिकॉम कंपन्यांच्या संगनमताने नवीन कार्ड जारी करेल.
ताज्या आकडेवारीनुसार (जुलै आधारित) HDFC च्या क्रेडिट कार्ड ग्राहकांची संख्या 14.76 दशलक्ष आहे. रिझर्व्ह बँकेने बंदी लागू केल्यानंतर क्रेडिट कार्ड बाजारात त्याचा वाटा 2 टक्क्यांनी कमी झाला. गेल्या एका महिन्यात बँकेने 4 लाखांहून अधिक नवीन ग्राहक जोडलेत. येत्या काही महिन्यांत हा व्यवसाय विभाग खूप वेगाने वाढेल, अशी त्याला अपेक्षा आहे.
डिसेंबर 2020 मध्ये RBI ने तांत्रिक आघाडीवर सतत अडचण आल्यावर HDFC बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली होती. एचडीएफसी बँकेचे पेमेंट्स आणि कन्झ्युमर फायनान्स, डिजिटल बँकिंग आणि आयटीचे ग्रुप हेड पराग राव म्हणाले होते की, केंद्रीय बँकेने बंदी उठवल्यानंतर बँक पुन्हा या बाजारात प्रवेश करत आहे. अशा परिस्थितीत त्याने स्वत: साठी काही ध्येये ठेवली आहेत.
आकडेवारीनुसार, कार्डांच्या संख्येच्या दृष्टीने बँकेचा बाजार हिस्सा 2 टक्क्यांनी घटून 25 टक्क्यांपेक्षा कमी झाला. आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय कार्ड्सने या संधीचा फायदा घेतला आणि बाजारातील वाटा कमी केला. राव म्हणाले की, एप्रिल-जून तिमाहीत क्रेडिट कार्डचा खर्च त्याच्या पोर्टफोलिओमध्ये 60 टक्क्यांनी वाढला.
संबंधित बातम्या
ज्येष्ठ नागरिकांसाठी देशात पहिल्यांदा एल्डर लाइन टोल फ्री क्रमांक, मदतीसाठी 14567 वर करा कॉल
मोदी सरकारची मोठी घोषणा, सरकारी शाळेत दुपारचं जेवण मोफत, कोट्यवधी मुलांना फायदा होणार
RBI distributes 4 lakh credit cards to HDFC in last one month