RBI Repo Rate : रेपो रेट करणार हॅटट्रिक, राहणार स्थिर? जनतेला मिळेल का तिसऱ्यांदा दिलासा

| Updated on: Aug 08, 2023 | 10:30 AM

RBI Repo Rate : महागाई जणू सर्वसामान्यांची परीक्षा पाहत आहे. भाजीपाला, डाळी, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भडकल्या आहेत. आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक होत आहे. त्याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

RBI Repo Rate : रेपो रेट करणार हॅटट्रिक, राहणार स्थिर? जनतेला मिळेल का तिसऱ्यांदा दिलासा
Follow us on

नवी दिल्ली | 08ऑगस्ट 2023 : महागाईने जणू तांडव सुरु केले आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून जनता मेटाकुटीला आली आहे. भाजीपाला, डाळी, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भडकल्या आहेत. अवकाळी आणि मुसळधार पावसाचा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. केंद्र सरकारचा उपाय पण महागाईपुढे थिटा पडला आहे. अनेक जणांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतले आहे. त्यांच्या डोक्यावर ईएमआयचा बोजा आहे. त्यांना वेगळीच चिंता सतावत आहेत. गेल्या वर्षात रेपो दरात वाढ झाल्याने त्यांचा हप्ता वाढला आहे. आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची (RBI Monetary Policy) बैठक होत आहे. यापूर्वी दोनदा आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) कुठलीच वाढ केलेली नाही. त्यामुळे यंदा रेपो दरात कुठलीही वाढ न करण्याची हॅटट्रीक आरबीआय करणार का? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

काय आहे अंदाज

महागाई वाढल्याने सर्वसामान्य चिंताग्रस्त आहेत. पण आरबीआय व्याज दर स्थिर ठेवेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आरबीआयच्या व्याजदरात वाढ होण्याचा सपाटा गेल्या वर्षी मे महिन्यापासून सुरु होता. पण फेब्रुवारी महिन्यात त्याला ब्रेक लागला. तेव्हापासू रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर आहे. एप्रिल आणि जून महिन्यात पतधोरण समितीने व्याजदरात कोणताच बदल केला नाही. आता तिसऱ्यांदा त्याची पुनरावृत्ती होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

जून महिन्यात महागाईचा चढता आलेख

देशात महागाई आटोक्यात असावी. ती 4 टक्क्यांच्या जवळपास असावी, यासाठी आरबीआय धोरण निश्चत करते. किरकोळ महागाईत 2 टक्क्यांची चढउतार होणार आहे. ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारीत महागाई दर जून महिन्यात 4.81 टक्क्यांवर पोहचला आहे. हा या तीन महिन्यातील सर्वात उच्चांक आहे.

भाजीपाला, धान्याचे दर वाढले

जून महिन्यात महागाईने उंच भरारी घेतली. टोमॅटोच्या किंमतीत 400 टक्क्यांची वाढ आली. अनेक ठिकाणी टोमॅटो 250 रुपयांवर पोहचला. खरीप पिकांवर मोठे संकट आले. मुसळधार पावसाने गणित बिघडवले. अद्रक, बटाटे, भेंडी, मिरची यांच्यासह इतर भाजीपाला महागला. त्यामुळे किचन बजेट विस्कळीत झाले.

महागाईचा परिणाम नाही

यस बँकचे मुख्य अर्थशास्त्री इंद्रनील पेन यांनी मत मांडले. त्यांच्या मते, टोमॅटोसह इतर भाजीपाला, अन्नधान्याच्या किंमती वाढल्या असल्या तरी त्याचा रेपो दरावर कुठलाही परिणाम होणार नाही.

वर्षभरात व्याजदरात मोठी वाढ

व्याज दरात वाढ करण्याची सुरुवात गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला. एप्रिल आणि त्यानंतर जूनमध्ये रेपो दरात वाढ झाली नाही.