शेअर मार्केटमध्ये महिन्याभरात या महिलेने केली 650 कोटींची कमाई

| Updated on: Dec 24, 2023 | 3:31 PM

Rekha Jhunjhunwala Wealth | शेअर बाजारातील गुंतवणुकीचा फायदा लाखो लोकांना झाला आहे आणि होत आहे. महिन्याभरात एका महिलेने शेअर बाजारात कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. शेअर बाजारात 650 कोटी रुपयांची भरभक्कम कमाई करणारी माहिला रेखा झुनझुनवाला आहे.

शेअर मार्केटमध्ये महिन्याभरात या महिलेने केली 650 कोटींची कमाई
Follow us on

मुंबई, दि.24 डिसेंबर | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे वाढले आहेत. आता मध्यमवर्गीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. शेअर बाजाराचा मुंबई निर्देशांक (बीएसई) ७० हजाराच्या वर पोहचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) २० हजाराचा वर पोहचला आहे. बाजारातील गुंतवणुकीचा फायदा लाखो लोकांना झाला आहे. महिन्याभरात एका महिलेने शेअर बाजारात कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. 650 कोटी रुपयांची भरभक्कम कमाई करणारी ही माहिला रेखा झुनझुनवाला आहे. केवळ तीन स्टॉकमधून रेखाने ही कामाई केली आहे. सर्वाधिक कमाई त्यांना टायटनच्या शेअरमधून मिळाली आहे. महिन्याभरात 5.4 टक्के कमाई यामध्ये झाली आहे.

मल्टीबॅगर स्टॉकने दिला जबरदस्त रिटर्न

शेअर बाजारात सध्या मल्टीबॅगर स्टॉकने जबरदस्त रिटर्न दिले आहे. झुनझुनवाला यांच्याकडे लिस्टेड कंपनीचे शेअर आहेत. या शेअरची किंमत तीन महिन्यांत 14 टक्के वाढली आहे. म्हणजेच या कंपन्यांनी तीन महिन्यांत 39000 कोटी रुपये कमवले आहे. टाटा मोटर्स डीवीआरचे शेअर्समध्ये 138 टक्के वाढ झाली आहे. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये हे शेअर आहेत. या कंपनीत रेखा झुनझुनवाला यांची 1.92 टक्के भागिदारी आहे. रेखा झुनझुनवाला यांची डीबी रियल्टी (DB Realty) मध्ये 2 टक्के भागिदारी आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये 108 टक्के वाढ झाली आहे. तसेच या वर्षी इंफ्रास्ट्रक्चर कंपन्यांचे शेअर दुप्पट वाढले आहेत.

सर्वाधिक भागेदारी टायटनमध्ये

झुनझुनवाला परिवारची सर्वाधिक गुंतवणूक टायटनच्या शेअरमध्ये आहे. जवळपास 5.4 टक्के वाटा त्यांचा टायटनच्या शेअरमध्ये आहे. यावर्षी या शेअरने 39 टक्के वाढ दिली आहे. झुनझुनवाला परिवाराची संपत्ती 17 हजार कोटी रुपये झाली आहे. झुनझुनवाला यांनी मार्च ते जून मध्ये या कंपनीत गुंतवणूक केली होती. रेखा झुनझुनवाला यांची टाटा मोटर्समध्ये 1.6 टक्के भागिदारी आहे. त्याची मार्केट व्हॅल्यू 3800 कोटी झाली आहे. यावर्षी या शेअरमध्ये 88 टक्के वाढ झाली आहे. टायटन आणि टाटा मोटर्सची स्वामित्व असणारी कंपनी आहे. तसेच झुनझुनवाला यांच्याकडे वीए टेक वबाग, वॉकहार्ट, जिओजित फायनेंसियल सव्हिसेस, नजारा टेक्नोलॉजीस, करूर वॅस्य बँक आणि मेट्रो ब्रांड्स यांचाही समावेश आहे.