मुकेश अंबानी यांनी रोज तीन कोटी खर्च केले तर त्यांची संपत्ती केव्हा संपणार, वाचून बसेल धक्का

| Updated on: Jul 14, 2024 | 9:08 AM

Mukesh Ambani net worth: मुकेश अंबानी आपल्या संपत्तीतून रोज 3 कोटी रुपये खर्च केले किंवा दान दिले तरी त्यांच्या अनेक पिढ्यांकडून ही संपत्ती संपणार नाही. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, 2024 मध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती जवळपास 1.98 लाख कोटींनी वाढ झाली आहे. मुकेश अंबानी आशियातील श्रीमंत व्यक्तीमध्ये पहिल्या दहा जणांमध्ये आहेत.

मुकेश अंबानी यांनी रोज तीन कोटी खर्च केले तर त्यांची संपत्ती केव्हा संपणार, वाचून बसेल धक्का
mukesh ambani
Follow us on

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा शाही विवाह १२ जुलै रोजी झाला. या विवाहनिमित्त कोट्यवधी रुपयांचा खर्च अंबानी परिवाराने केला. जगभरातील बडे नेते, उद्योजक, हॉलीवूड अन् बॉलीवूड स्टार या विवाह समारंभाला हजर होते. त्यामुळे विवाह सोहळ्याच्या खर्चाची चर्चाही माध्यमांमध्ये होत आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे 10.21 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुकेश अंबानी यांनी रोज तीन कोटी रुपये दान केले तर त्यांची संपत्ती कधी संपणार? ही माहिती वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटणार आहे.

3 लाख 40 हजार 379 दिवसांना संपणार संपत्ती

मुकेश अंबानी यांनी रोज 3 कोटी खर्च केले किंवा दान केले तर त्यांची संपत्ती खर्च होण्यासाठी 3 लाख 40 हजार 379 दिवस लागणार आहे. वर्षभरात 365 दिवस असतात. यामुळे 3 लाख 40 हजार 379 दिवसांना वर्षात बदलल्यास 932 वर्ष 6 महिन्यात मुकेश अंबानी यांची संपत्ती संपणार आहे.

अनेक पिढ्या संपत्ती संपणार नाही

मुकेश अंबानी आपल्या संपत्तीतून रोज 3 कोटी रुपये खर्च केले किंवा दान दिले तरी त्यांच्या अनेक पिढ्यांकडून ही संपत्ती संपणार नाही. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, 2024 मध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती जवळपास 1.98 लाख कोटींनी वाढ झाली आहे. मुकेश अंबानी आशियातील श्रीमंत व्यक्तीमध्ये पहिल्या दहा जणांमध्ये आहेत.

हे सुद्धा वाचा

सध्या मुकेश अंबानी चर्चेत कारण…

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअमरन मुकेश अंबानी आहेत. त्यांचे मुंबईतील घर अँटिलिया हे जगातील सर्वात महागडे खाजगी घर आहे. सध्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी अनंत अन् राधिका यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंटसोबत 12 जुलै रोजी मुंबईत झाला. हे लग्न भारतातील सर्वात मोठ्या आणि मोठ्या थाटामाटात साजरे झालेल्या लग्नांपैकी एक होते. त्यात देश-विदेशातील अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला.