मेगा डीलनंतर मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांना दिले ₹70 हजार कोटींचे गिफ्ट, बनल्या या कंपनीच्या नवीन बॉस

| Updated on: Nov 16, 2024 | 10:03 AM

mukesh ambani nita ambani: नीता अंबानी या कंपनीच्या चेअरमन झाल्या आहेत. परंतु त्यांच्यासमोर सोनी, नेटफ्लिक्स, एमेजॉनसारख्या कंपन्यांचे आव्हान असणार आहे. या मेगा डीलचा परिणाम रिलायन्सच्या शेअरवर दिसणार आहे.

मेगा डीलनंतर मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांना दिले ₹70 हजार कोटींचे गिफ्ट, बनल्या या कंपनीच्या नवीन बॉस
mukesh ambani nita ambani
Follow us on

Mukesh Ambani Mega Deal: देशाचे दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडिस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी मोठी डील पूर्ण केली आहे. वर्षभरापासून सुरु असलेल्या चर्चेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने वायाकॉम 18 आणि डिज्नीची डील पूर्ण केली आहे. 70 हजार 352 कोटींची ही डील आहे. या डीलमुळे डिज्नी स्टार इंडिया आणि रिलायन्सचे वॉयकॉम-18 एक झाले आहे. आता रिलायन्सकडे 2 OTT आणि 120 चॅनल आहे. तसेच 75 कोटी प्रेक्षकांचा डेटाबेस आहे. या नवीन कंपनीची जबाबदारी मुकेश अंबानी यांनी त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्याकडे दिली आहे.

वर्षाला 26000 कोटी रुपये महसूल

70 हजार 352 कोटी रुपयांच्या या डीलमध्ये रिलायन्सची 63.16 टक्के भागिदारी आहे. डिज्नीजवळ 36.84 टक्के भागेदारी असणार आहे. तीन सीईओसोबत नीता अंबानी या कंपनीची सूत्र सांभाळणार आहे. या ज्वाइंट व्हेंचरचे मूल्य एकूण 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार आहे. त्यातून वर्षाला 26000 कोटी रुपये महसूल मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

नीता अंबानी यांच्याकडे जबाबदारी

100 पेक्षा जास्त चॅनल आणि दोन ओटीटी चॅनल असणाऱ्या या मीडिया कंपनीची जबाबदारी नीता अंबानी यांच्याकडे असणार आहे. त्या या संयुक्त भागेदारी कंपनीच्या चेअरमन असणार आहे. तसेच या कंपनीत तीन सीईओ असणार आहे. सध्या केविन वाज या प्लॅटफॉर्मवर एंटरटेनमेंट ऑर्गेनाइजेशनचे नेतृत्व करत आहे. किरण मणी ज्‍वाइंट डिजिटल ऑर्गेनाइजेशनचे नेतृत्व सांभाळणार आहे. तसेच संजोग गुप्ता ज्‍वाइंट स्पोर्ट्स ऑर्गेनाइजेशनचे नेतृत्व करणार आहे. या कंपनीचे व्हाईस चेअरमन उदय शंकर असणार आहे.

हे सुद्धा वाचा

नीता अंबानी यांच्यासमोर हे आव्हान

नीता अंबानी या कंपनीच्या चेअरमन झाल्या आहेत. परंतु त्यांच्यासमोर सोनी, नेटफ्लिक्स, एमेजॉनसारख्या कंपन्यांचे आव्हान असणार आहे. या मेगा डीलचा परिणाम रिलायन्सच्या शेअरवर दिसणार आहे. नुकतेच विदेशी ब्रोकरेज हाउस सीएवएलएने म्हटले आहे की, येत्या काळात रिलायन्सच्या शेअरमध्ये चांगली प्रगती दिसणार आहे. 70 टक्के ग्रोथ रिलायन्सच्या शेअरला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता रिलायन्सच्या शेअरवर असणार आहे.