देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज( RIL) लिमिटेड आता मीडिया बिझनेसला ( Media Business) मजबूत करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून 12000 कोटी रूपये जमा करण्याची योजना आखत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज स्वतःसोबत गुंतवणूकदारांना सहभागी करून घेत ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मीडिया या दोन्ही बिझनेसला दुपटीने वाढवायचे नियोजन करत आहे. याशिवाय कंपनी मीडिया व्यवसायात स्वतःची गुंतवणूक करणार आहे. मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मीडियाला प्रयत्नपूर्वक मीडिया बिझनेस वाढवायचा आहे. रिलायन्स मोठी गुंतवणूक करून अँमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टारला स्पर्धा देण्याच्या तयारीत आहे.
रिपोर्टमध्ये अज्ञात सूत्रांच्या माहितीनुसार रिलायन्सने स्टार आणि डिझ्नी इंडियाचे माजी अध्यक्ष उदय शंकर आणि मीडिया तज्ज्ञ जेम्स मर्डोक यांना मीडिया बिझनेसची रणनीती ठरवण्यासाठी सहभागी करून घेतले आहे. मीडिया बिझनेसच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, रिलायन्सच्या डिसरप्शन स्ट्रँटिजी जियो( JIO) सोबत डिजिटल व्यवसायात समान सहभागी असतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीडिया बिझनेसमध्ये रिलायन्सचा अधिक वाटा असेल तर वायकॉमचा वाटा हा कमी असणार आहे.
वायकॉम 18, नेटवर्क 18 आणि वायकॉमसीबीएस यांचे एकत्रित व्हेंचर आहे. यामध्ये नेटवर्क 18 चा 51 % आणि वायकॉमसीबीएस 49% वाटा आहे. वायकॉम 18 हे 52 चँनलची ऑफर देऊन महिन्याला जवळपास 6 कोटी भारतीयांपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे आता हे भरतामध्ये सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क तयार होणार आहे. यामाध्यमातून अॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारला तगडी स्पर्धा निर्माण होईल हे नक्की.
टीसीएसचा जागतिक ठसा, आयटीमधील जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी!
OYOचा IPO लवकरच बाजारात, बीएसई, एनएसई मध्ये लवकरच समावेश, मंजुरी मिळाली