मुंबई | दि. 8 मार्च 2024 : देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री वेडींग समारंभ नुकताच झाला. त्याची चर्चा देशभर झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजची शेअर मार्केटमध्ये घोडदौड सुरु आहे. गुंतवणूकदरांना या कंपनीने चांगला परतावा दिला आहे. टेलीकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत रिलायन्सचा विस्तार झाला आहे. धीरुभाई अंबानी यांनी सुरु केलेली ही कंपनी भारतातील मोठा उद्योग समूह म्हणून नावरुपाला आली आहे. या कंपनीचे कामकाज मुकेश अंबानी, नीता अंबानी प्रमाणे त्यांची तीन मुले ईशा, आकाश आणि अनंत अंबानी सांभाळत आहेत. या कंपनीचे सर्वाधिक शेअर या पाचही जणांकडे नाही. कंपनीची सर्वात मोठी मालकीन मुकेश अंबानी यांची आई कोकीलाबेन आहेत. त्यांच्याकडेच कंपनीचे सर्वाधिक शेअर आहेत.
मागील वर्षी कंपनीच्या संचालक मंडळात आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांची एन्ट्री झाली. शेअर धारकांच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता मुकेश अंबानी यांनी तिघं भाऊ-बहिणींमध्ये समान शेअरची वाटणी केली आहे. तसेच त्यांच्याकडे जितके शेअर आहेत, तितके शेअर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडे आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, डिसेंबर 2023 पर्यंत प्रमोटर्सकडे कंपनीचे 50.30 टक्के शेअर आहेत. पब्लिक शेअरहोल्डिंग 49.70 टक्के आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रमोटर्समध्येअंबानी परिवाराचे सहा सदस्य आहेत. त्यात मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश, ईशा आणि अनंत अंबानी आहेत. या सर्वांकडे कंपनीचे 80 लाख 52 हजार 21 शेअर आहे.
मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन धीरूभाई अंबानी यांच्याजवळ कंपनीचे सर्वाधिक शेअर आहेत. त्यांच्याकडे 1 कोटी 57 लाख 41 हजार 322 शेअर आहेत. यामुळे कंपनीत सर्वाधिक त्यांची भागेदारी आहे. कोकिलाबेन रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अंबानी परिवारातील सर्वात मोठी शेअरधारक आहेत. तसेच कोकिलाबेन यांच्याकडे जिओ फायन्सनेंशिअल सव्हिसेज लिमिटेडचे मोठी भूमिका आहे.