मुंबई: पैशांची बचत हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही किती बचत करता यावर तुमच्या भविष्यातील योजना अवलंबून असतात. बचत केलेला पैसा आपण एखाद्या योजनेमध्ये गुंतवल्यास त्यातून आपल्याला एक विशिष्ट रक्कम परताव्याच्या रुपाने मिळत असते. गुंतवणुकीचे अनेक प्रकार असतात, तुम्ही करत असलेली गुंंतवणूक ही लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्म प्रकारातील असू शकते. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणुक करा, मात्र पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
सर्व प्रथम तुम्हाला बचत कशासाठी करायची आहे ते ठरवा, एकदा तुमचे उद्दिष्ट ठरले की बचत करायला सुरू करा. मात्र ही बचत करत असताना किंवा एखाद्या योजनेत गुंतवणूक करत असताना महागाईचा विचार करणे देखील आवश्यक आहे. समजा तुम्ही गाडी खरेदीसाठी बचत करत असाल तर आज गाडीची किंमत एक लाख असेल तर कालंतराने वाढून 2 लाखांच्या आसपास जाऊ शकते. हे गणित लक्षात घेऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता.
हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठल्याही योजनेत गुंतवणूक करत असताना आपल्याला ते पैसे कधी परत मिळणार आहेत? त्या योजनेचा कालावधी किती आहे, याचा विचार करणे महत्वाचे असते. समजा आपल्याला पाच वर्षानंतर जर घर खरेदीसाठी पैसे हवे असतील, तर अशाच एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवा की ती योजना पाच वर्षांमध्ये चांगला परतावा देऊ शकेल. तसेच जर 18 -20 वर्षानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे आवश्यक असल्यास त्यावेळी आपल्याला चांगल्या परताव्यासह पैसे उपलब्ध होतील अशा एखाद्या योजनेत पैसे गुंतवा.
हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही केलेली पैशांची बचत हेच तुमच्यासाठी सर्व काही असते. त्यामुळे एखाद्या योजनेत पैसे गुंतवताना त्यामध्ये किती जोखीम आहे? हे देखील लक्षात घ्यावे लागेत. पोस्टाच्या विविध योजना असतील किंवा बँकेची मुदत ठेव योजना असेल यामध्ये कमी जोखमी आहे. मात्र तेच जर तुम्ही म्युचल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्यात जास्त जोखमी असू शकते. त्यामुळे बचत सुरक्षीत ठिकाणी गुंतवण्यास प्राधान्य द्या.
बाजारामध्ये काही योजना अशा असतात की त्यातून मोठ्या प्रमाणात परतावा मिळतो, मात्र त्यात जोखमी अधिक असते. परंतु त्याउलट अशा देखील काही योजना असतात, की ज्यामध्ये जोखीम नसते, मात्र परतावा देखील अल्प मिळतो. तर आपल्याला या दोनही गोष्टी लक्षात घेऊन ज्या योजनांमध्ये जोखीम कमी आहे, मात्र परतावा अधिक मिळू शकतो अशा योजनांची निवड करणे फायदेशी ठरू शकते.
PAN card update: लग्नानंतर पॅनमध्ये आडनाव किंवा पत्ता बदलायचा की नाही, जाणून घ्या प्रक्रिया काय?#ApplyForPANCard #PanCard #PanCardAadharCardLink #PanCardOnline https://t.co/WI2UAMlJlo
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 21, 2021
शेअर बाजार कोसळला; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 5.4 लाख कोटींचा फटका