नवी दिल्ली : गेल्या सतरा महिन्यातील उच्चांकी आकडा महागाईनं (Inflation) गाठलाय. किरकोळ महागाईत वाढ सुरुच असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. गेल्या 17 महिन्यात किरकोळ महागाईचा दर हा कधीच इतक्या विक्रमी (Highest inflation in last 17 years) स्तरावर पोहोचलेला नव्हता. मार्च महिन्यात किरकोळ महागाई 6.95 वर जाऊन पोहोचली आहे. मार्च महिन्यात झालेली किरकोळ महागाईतली वाढ प्रचंड असल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं आहे. खाद्यपदार्थांच्या (Food Inflation) वाढलेल्या किंमतींमुळे किरकोळ महागाईचा दर आवाक्यात येणं तर दूरच पण आता हा दर चिंताजनक स्थितीवर जाऊन पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई ही 6.07 टक्के होता. आता हा दर 6.95 झाला आहे.
मार्चच्या सुरुवातीच्या दिवसांत किरकोळ महागाईचा दर हा 7.68 टक्के इतरा होता. दरम्यान, फेब्रुवारीच्या सुरुवातीला किरकोळ महागाईचा दर 5.85 टक्क्यांवर होता. दरम्यान, मार्च महिन्यात पेट्रोलसोबतच भाज्यांचे दर आणि खाद्यतेलाच्या किंमतीही वाढल्यानं दिसून आल्यानं सर्वसामान्यांचं बजेट मोडलंय.
मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाईचा कुठे किती आहे आणि गेल्या महिन्यात किती होता, यावरही एक नजर टाकुयात.
गेल्या वर्षीच्या तुलेत ग्रामीण भागात महागाई वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. तर दुसरीकडे खाद्यपदार्थांचे दर हे 7.68 टक्क्यांनी वाढले आहेत. ग्रामीण भागातही खाद्य पदार्थांचे दर 8.04 तर शहरी भागात खाद्य पदार्थांचे दर 7.04 टक्क्यांनी वाढले असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
सलग तिसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढलेला असल्याचं दिसून आलं आहे. या वाढत्या महागाईनं सगळ्यांचंच बजेट कोलमडलेलं आहे. रिझर्व बँकेनं किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा चार टक्के ठेवण्याचं ध्येस समोर ठेवलं आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात दुधाच्या किंमती, खाद्य पदार्थांच्या किंमती या सगळ्यांवर इंधन दरवाढीचा परिणाम जाणवला आहे.
महागाईचा फटका सगळ्यांना बसताना बघायला मिळतोय. जर किरकोळ बाजारातील महागाईचा दर असात वाढत राहिला तर आरबीआयला कर्जावरील व्याजाचा दरही वाढवावा लागू शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्या आरबीआयनं घातलेल्या किरकोळ बाजारातील महागाईच्या दरापेक्षा दोन टक्के जास्त महागाई दर असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.
‘आरबीआय’ नियंत्रित बाजाराची वेळ बदलली ; सोमवार पासून सकाळी ‘नऊ’ ला सुरू होईल कामकाज
मेहनत आणि इमानदारीचे फळ; चेन्नईमधील आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कारची भेट