मुंबई : रॉयल एनफील्ड (Royal Enfield) ही भारतीय बाजारपेठेतली एक लोकप्रिय बाइक आहे. तिचं क्लासिक व्हेरिएंट 350(Classic 350)ला प्रचंड मागणी आहे. पण आता कंपनी आपल्या Royal Enfield 350 Classicचे 26,300 युनिट्स परत मागवत आहे. यामागं कंपनीनं ब्रेक सिस्टमचा प्रॉब्लेम हे कारण सांगितलंय. तुमच्याकडे जर या बाइकचं हे युनिट असेल, तर जाणून घ्या, कायं म्हटलंय कंपनीनं..?
ठरू शकतं त्रासदायक
टेक्निकल टीमनं या वर्षी 1 सप्टेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत रॉयल एनफिल्डनं उत्पादित केलेल्या बाइकमध्ये एक मोठी त्रुटी शोधून काढलीय, जी ब्रेक्समध्ये आहे. दुचाकीचालकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे. टीमला असं आढळलं, की काही विशिष्ट परिस्थितींदरम्यान ब्रेक यंत्रणा त्रासदायक ठरू शकतं.
ब्रेकमधून आवाज
मागील पॅडलवर असलेल्या ब्रेक सिस्टीमवर खूप वेगानं ब्रेक मारण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या ब्रेकवर वेगळा परिणाम होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत, चालकाला ब्रेकमधून आवाज ऐकू येईल आणि हे चालकासाठी धोकादायकही ठरू शकतं.
लवकरच दूर होणार समस्या?
ही समस्या फक्त सिंगल चॅनल ABS, रियर ड्रम ब्रेक क्लासिक 350 मॉडेलमध्ये येतेय, जे या वर्षी 1 सप्टेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे कंपनीनं या मोटारसायकली परत मागवण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून त्यातील उणीवा दूर करता येतील. कंपनीकडून असं सांगण्यात आलंय, की ही समस्या केवळ विशेष परिस्थितीत आणि वेगळ्या प्रकारच्या राइडिंग कंडिशनमध्ये दिसून आलीय, कंपनी लवकरच ही समस्या दूर करेल.
समस्या कशी सोडवली जाईल?
यासाठी रॉयल एनफिल्डची सेवा टीम आणि स्थानिक डीलरशिप या विशिष्ट तारखेच्या आत उत्पादित मोटरसायकल खरेदी केलेल्या ग्राहकांशी संपर्क साधतील. यासाठी, Royal Enfield 350 Classicचे मालक स्वतः Royal Enfieldच्या वेबसाइटवर जाऊन किंवा स्थानिक वर्कशॉपला भेट देऊन त्यांची बाइक तपासू शकतात.
2021 Royal Enfield Classic 350ची वैशिष्ट्ये
2021 Royal Enfield Classic 350 सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि त्याची स्टार्टिंग प्राइज 1.84 लाख रुपये आहे, जी 2.15 लाख रुपये (एक्स-शोरूम)पर्यंत जाऊ शकते. ही अपडेटेड मोटरसायकल Meteor 350च्या J प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलीय.
अधिक आरामदायी
ही रेट्रो क्रूझर बाईक USB चार्जरसह येते. नवीन डिझाइन केलेल्या या मोटरसायकलमध्ये नवीन डिझाइन केलेले टेल लाइट्स दिसणार आहेत. यासोबतच यात 13 लीटर क्षमतेची अद्ययावत एक्झॉस्ट पाइप आणि पेट्रोल टाकी मिळेल. तसेच, अद्ययावत सीटदेखील आहे, जी अधिक आरामदायी आहे.