नवी दिल्लीः क्रिकेटचा देव म्हणून बिरुद मिरवणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) डिजिटल मनोरंजन (Digital Entertainment) आणि तंत्रज्ञान कंपनी जेटसिंथेसिसमध्ये (JetSynthesys) सुमारे 15 कोटी रुपये (20 लाख डॉलर) गुंतवले आहेत. गुंतवणुकीमुळे कंपनीचे तेंडुलकरसोबतचे संबंध अधिक दृढ झालेत. या कंपनीच्या भागधारकांमध्ये अदर पूनावाला आणि क्रिस गोपालकृष्णन यांचाही समावेश आहे. जेटसिंथेसिस ही पुणेस्थित कंपनी आहे आणि भारताव्यतिरिक्त जपान, ब्रिटेन, यूरोपीय संघ, अमेरिका येथे त्याची कार्यालये आहेत.
या दोघांचा आधीपासून डिजिटल क्रिकेट डेस्टिनेशन 100 एमबी (100MB) आणि सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स (Saga Cricket Champions) आणि सागा व्हीआर (Sachin Saga VR) या इमर्सिव क्रिकेट खेळासाठी संयुक्त उपक्रम आहे.
तेंडुलकर म्हणाले, जेटसिंथेसिसशी माझा संबंध जवळजवळ पाच वर्षांचा आहे. आम्ही सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्सच्या माध्यमातून आमचा प्रवास सुरू केला आणि एका अनोख्या व्हर्च्युअल रिअॅलिटी क्रिकेट अनुभवासह ते बळकट केले. आता त्याच्या श्रेणीतील हा सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे आणि 2 कोटींहून अधिक वेळा डाऊनलोड केला गेलाय. जेटसिंथेसिसचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन नवानी यांच्या म्हणण्यानुसार, सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्सचा दैनिक वापर दर 12 महिन्यांत दुप्पट झाला आहे. सध्या त्याचे 20 लाख फॉलोअर्स आहेत. आयपीएल आणि वर्ल्ड कपमुळे आगामी काळात 100 एमबीची वाढ होण्याचीही शक्यता आहे.
सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्ससारख्या गेम लाँच करण्याबरोबरच जेटसिंथेसिसने गेल्या वर्षी गेमिंग स्टुडिओ नॉटिलस मोबाईल विकत घेतला. गेमिंग स्टुडिओ हा ऑनलाईन क्रिकेट गेम रिअल क्रिकेटचा निर्माता आहे. रिअल क्रिकेटमध्ये 120 मिलियन अधिक डाउनलोड आणि 1.2 कोटी मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. खेळांबरोबरच जेटसिंथेसिसने ई-स्पोर्ट्स कंपनी नोडविन गेमिंगची सह-स्थापना देखील केली.
यंदा फेब्रुवारीमध्ये सचिन तेंडुलकरने बंगळुरूस्थित शैक्षणिक तंत्रज्ञान स्टार्टअप असलेल्या Unacademy मध्ये हिस्सा विकत घेतलाय. यात सचिन आपला अनुभव सांगणार असून, क्रिकेटशी संबंधित बारकाव्यांची माहिती देणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, कोणतीही व्यक्ती Unacademy च्या प्लॅटफॉर्मद्वारे या वर्गात थेट मोफत प्रवेश करू शकते.
संबंधित बातम्या
Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने स्वस्त, खरेदीची सुवर्णसंधी, झटपट तपासा
सरकारकडून 50% सबसिडी घेऊन 30 हजारांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा 3 लाख कमवा
Sachin Tendulkar invests Rs 15 crore in JetSynthesys, Poonawala also owns shares in the company