मुंबई : संपूर्ण देशामध्ये आज असे अनेक कामगार आहेत जे ठेकेदाराकडे अथवा खासगी संस्थांकडे काम करत आहे. ही एक प्रकारची वेठबिगारीच म्हणा ना. देशात अशा असंघटित कामगारांची संख्या खूप मोठी आहे, ज्यांचं हातावर पोट आहे. रोज कमाई करायची आणि त्याच्यावरच गुजराण करायची अशी त्यांची स्थिती आहे. त्यांच्या पिळवणुकीला आवाज नाही. ठेकेदारांकडून होणारी पिळवणूक रोजचीच आहे, मात्र पोटासाठी ते अन्याय सहन करतात. आतापर्यंत असंघटित कामगारांवरील अन्याय विरोधात सक्षम यंत्रणा उपलब्ध नव्हती. मात्र आता सरकारने यावर समाधानाचा तोडगा शोधला आहे. असंघटित कामगारांना त्यांच्या पिळवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी केंद्र सरकारने समाधान शोधले आहे. केंद्र सरकारने समाधान (SAMADHAN) नावाचे पोर्टल सुरू केले आहे.
कामगार आता थेट या पोर्टलमार्फत तक्रार दाखल करू शकतात. ही तक्रार थेट तडजोड अधिकाऱ्याकडे (settlement officer) दिली जाते. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये कामगारांनी काम केल्यानंतरही त्याचा मोबदला संबंधित ठेकेदार वा मालक देत नाहीत. अशा स्थितीत कामगार शिव्या शाप देण्याा व्यतिरिक्त काही करू शकत नाही, परंतु आता त्याला या अन्याय विरोधात थेट तक्रार नोंदविता येणार आहे.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने त्यांच्या ट्विटर हँडल(Twitter Handal) भरून समाधान पोर्टलची samadhan.http://labour.gov.in माहिती दिली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, देशातील कामगारांना त्यांच्या मालका विरोधात, ठेकेदार विरोधात काही अडचणी असल्यास किंवा त्यांची फसवणूक, पिळवणूक होत असल्यास त्यांनी थेट या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. अधिकारी या प्रकरणी मध्यस्थी करून त्यांना न्याय मिळवून देतील. त्यासाठी या संकेत स्थळावर कामगारांना तक्रार नोंदवावी लागेल.
कामगाराला सर्वात अगोदर समाधान पोर्टल samadhan.http://labour.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. वेबसाइटवर गेल्यावरच होमपेज समोर दिसेल उजव्या बाजूला समाधान पोर्टल वर तुमच्या नाव साइन इन (SIGN IN) करावे लागेल. त्या ठिकाणी दोन पर्याय मिळतील. यातील पहिला पर्याय निवडा. त्यानुसार तुम्ही समाधान पोर्टल वर साइन इन करा.
दुसरा पर्याय हा त्या लोकांसाठी आहे ज्यांनी अगोदरच समाधान पोर्टलवर नोंदणी केली आहे. साइन इन केल्यावर नवीन पेज उघडेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर नोंद करावा लागेल त्यांनी व्हेरिफिकेशन कोड द्वारे त्याची पडताळा करून द्यावा लागेल. त्यानंतर कामगाराला औद्योगिक विवाद प्रोफॉर्म (PRO FORM) दिसेल तू पूर्ण भरून द्यायचा आहे.
या ठिकाणी तुमच्या तक्रारीची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. सर्वात शेवटी हा फॉर्म सेव्ह(SAVE) करा. त्यानंतर तुम्ही दिलेली तक्रार तुम्हाला दिसेल.
सर्वात महत्त्वाची सूचना- तुम्ही खोटी माहिती देत असाल किंवा चुकीचे आरोप करत असाल तर अशा तक्रारींवर विचार होणार नाही.
तुम्हाला त्यासंदर्भात समाधान मिळणार नाही उलट चुकीची तक्रार केली म्हणून संबंधित कामगारा विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो.
वाद आयडी द्वारे (DISPUTE ID) कामगाराला त्याच्या तक्रारीची सध्यस्थिती समजेल.
संबंधित बातम्या :
आरोग्य विमा काढताना काय काळजी घ्यावी?, जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बाबी
तुम्ही आयटीआर भरलात का?; जाणून घ्या आयटीआर भरण्याचे ‘हे’ महत्त्वपूर्ण फायदे