diageo india
नुकतंच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने खास मुलींसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ज्यामुळे पालकांना मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची सर्व चिंता मिटणार आहेत.
सध्या बाजारात एलआयसीची एक पॉलिसी कन्यादान पॉलिसी या नावाने बाजारात विकली जात आहे. मात्र प्रत्यक्षात तशी कोणतीही योजना नाही. ही योजना म्हणजे एलआयसीच्या जीवन लक्ष्य पॉलिसीचे customized version आहे.
ही पॉलिसी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी एजंट त्याला कन्यादान योजना या नावाने ओळखतात. या योजनेच्या नावामुळे अनेक जण यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होतात.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला निश्चित उत्पन्नासह भांडवलाच्या सुरक्षिततेची हमी मिळते. या योजनेसाठी तुम्हाला दररोज 127 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला 27 लाख रुपये परतावा मिळेल.
या योजनेची खास गोष्ट म्हणजे ही योजना 25 वर्षांसाठी आहे. पण तुम्हाला यात 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो.
जर या योजनेदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला, तर कुटुंबाला कोणतेही प्रीमियम द्यावे लागत नाही. त्यासोबतच योजनेच्या उर्वरित वर्षांत मुलीला दरवर्षी 1 लाख रुपये मिळतात
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान 30 वर्षे आणि मुलीचे वय एक वर्ष असले पाहिजे. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीची मुदत कमी केली जाईल. हे धोरण कमी-अधिक प्रीमियमनुसारही घेतली जाऊ शकते