Rules Changes : आजपासून हे बदलले नियम, तुमच्या आयुष्यावर काय होईल परिणाम जाणून घ्या..

| Updated on: Oct 01, 2022 | 9:10 PM

Rules Changes : आजपासून देशात अनेक बदल झाले आहेत. त्याचे तुमच्या खिशावर काय परिणाम झाला ते पाहुयात..

Rules Changes : आजपासून हे बदलले नियम, तुमच्या आयुष्यावर काय होईल परिणाम जाणून घ्या..
हे बदल करणार परिणाम
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : आजपासून देशातील अनेक क्षेत्रात मोठे बदल (Rules Changes) झाले आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. 1 ऑक्टोबर म्हणजे आजपासून गुंतवणुकीचा (Investment) एक नियम बदलला आहे. तर अल्प बचत योजनांवर (Small Savings Scheme) तुम्हाला फायदा होणार आहे. हे बदल काय आहेत आणि त्याचा काय परिणाम होईल, ते पाहुयात..

आजपासून प्राप्तिकरदात्यांना एका महत्वाच्या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. अटल पेन्शन योजनेत (APY) करदात्यांना आता सहभागी होता येणार नाही. 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील नागरिकांना या योजनेत सहभागी होता येत होते. पण आता त्याला करदाते अपवाद ठरले आहेत. त्यांना या योजनेत सहभाग घेता येणार नाही.

केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा दिला आहे. 2 वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात 5.5% वरून 5.7% वाढ करण्यात आली आहे. तर 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 5.8% करण्यात आला आहे. पूर्वी हा व्याजदर 5.5% होता.

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. त्यांच्या बचत योजनेवरील व्याजदर आता 7.6% झाला आहे. पूर्वी हा व्याजदर 7.4% होता. किसान विकास पत्रावरील व्याजदर 6.9% हून 7.0% झाला आहे. तर मासिक उत्पन्न खाते योजनेत 6.7% वार्षिक व्याज मिळेल. पूर्वी हा व्याजदर 6.6% होता.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर आता 7.4% वरून 7.6% झाला आहे. त्याच वेळी, मासिक उत्पन्न खाते योजनेवर आता 6.6% ऐवजी 6.7% वार्षिक व्याज मिळेल. याशिवाय किसान विकास पत्रावरील व्याजदर 6.9% वरून 7.0% झाला आहे.

आजपासून क्रेडिट-डेबिट कार्ड पेमेंटसाठी टोकनायझेशन प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी, पेमेंट एग्रीगेटर आणि पेमेंट गेटवे यांना तुमच्या कार्डचा तपशील जमा करता येणार नाही. यामुळे ऑनलाईन फसवणुकीला आळा बसेल.

1 ऑक्टोबरपासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना नामांकनाचा अर्ज भरावा लागेल. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना (AMCs) ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज भरून घ्यावा लागेल. कंपन्यांना अर्जावर ई-स्वाक्षरी घ्यावी लागेल.

डी-मॅट खातेधारकांना 30 सप्टेंबर 2022 रोजी पर्यंत द्वि-घटक प्रमाणीकरण (Two Authentication Factor) पूर्ण करावे लागेल. त्याशिवाय त्यांच्या डीमॅट खात्यात त्यांना लॉग-इन करता येणार नाही.