बचत खाते काढायचा विचार करताय? ‘या’ बँका देतायत 7 टक्क्यांपर्यंत व्याज

| Updated on: Oct 07, 2021 | 10:38 AM

देशातील अनेक लोक कुठेही गुंतवणूक करत नसले तरी ते बचत खाते उघडतात. बचत खाते उघडताना अनेक जण व्याज दर किती मिळतो याचा विचार करत नाहीत

बचत खाते काढायचा विचार करताय? या बँका देतायत 7 टक्क्यांपर्यंत व्याज
money
Follow us on

Best Savings Account Interest Rates नवी दिल्ली: देशातील अनेक लोक कुठेही गुंतवणूक करत नसले तरी ते बचत खाते उघडतात. बचत खाते उघडताना अनेक जण व्याज दर किती मिळतो याचा विचार करत नाहीत. बहुतेक बचत खातेधारकांचा उद्देश पैशांची बचत करणे हा असतो. तुम्ही सुद्धा बँकेत पैसे जमा करत असाल तर काही बँकांच्या व्याजदरांचा तुलनात्मक अभ्यास करुन तुम्ही बचत खात्यावर मुदत ठेवी इतके व्याज मिळवू शकता. देशातील काही लहान बँका आणि स्मॉल फायनान्स बँका मोठ्या बँकांच्या तुलनेत बचत खात्यांवर 7 टक्के व्याज देत आहेत.

IDFC फर्स्ट बँक

1 लाख रुपयांपर्यंत रक्कम : 4.00 टक्के
1 लाख ते 10 लाख : 4.50 टक्के
10 लाख ते 2 कोटी : 5.00 टक्के
2 कोटी ते 10 कोटी : 4.00 टक्के
10 लाख ते 100 दशलक्ष पर्यंत राशी: 3.50 टक्के
100 दशलक्षाहून अधिक राशींपैकी : 3.00 टक्के

बंधन बँक

1 लाख रुपयांपर्यंत रक्कम : 3.00 टक्के
1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत : 4.00 टक्के
10 लाख ते 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त : 6.00 टक्के

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

1 लाख रुपयांपर्यंत रक्कम : 3.75 टक्के
1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 1 कोटी रुपयांपर्यंत : 7.00 टक्के
1 कोटी रुपयांपेक्षा जास्त : 6.00 टक्के

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

1 लाख रुपयांपर्यंत रक्कम : 3.75 टक्के
1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 25 लाख रुपयांपर्यंत : 6.00 टक्के
25 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 10 कोटी रुपयांपर्यंत : 7.00 टक्के
10 कोटी रुपयांपेक्षा जास्त : 6.75 टक्के

AU स्मॉल फायनान्स बँक

1 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम : 3.50 टक्के रक्कम 1 लाख ते
10 लाख रुपयांपेक्षा कमी : 5.00 टक्के
10 लाख ते 25 लाख रुपयांपेक्षा कमी : 6.00 टक्के
25 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपेक्षा कमी : 7.00 टक्के
1 कोटी ते 10 कोटी रुपयांपर्यंत : 6 टक्के

जन स्मॉल फायनान्स बँक

1 लाख रुपयांपर्यंत रक्कम : 3.00 टक्के
1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 10 लाख रुपयांपर्यंत : 6.00 टक्के
10 लाख रुपये आणि 50 कोटी रुपयांपर्यंत : 6.50 टक्के
50 कोटी रुपयांपेक्षा जास्त – 6.75 टक्के

(टीप: हे सर्व दर या बँकांच्या वेबसाईटवरून घेतले आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वत: खात्री करुन घ्यावी)

इतर बातम्या:

दूरसंचार विभागाची आणखी एक घोषणा, व्होडाफोन आयडियाला 12 हजार आणि एअरटेलला 8000 कोटींचा फायदा

सरकारने मोबाईल सिम कार्डशी संबंधित नियम बदलले, जाणून घ्या

savings account interest rate get upto seven percent check details here